1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरुपौर्णिमा
Written By
Last Modified: बुधवार, 9 जुलै 2025 (12:52 IST)

स्वामी समर्थ भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा

उगाची भितोसी भय हे पळू दे, 
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, 
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, 
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
स्वामी समर्थ भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
 
जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे 
जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ 
युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा
स्वामी समर्थ भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
 
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
स्वामी समर्थ भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
 
गरिबाला केलेले दान आणि 
सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव 
कधी वाया जात नाही 
श्री स्वामी समर्थ 
स्वामी समर्थ भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
 
कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, 
आपण आपलं चांगलं काम करायचं असतं
श्री स्वामी समर्थ 
स्वामी समर्थ भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
 
उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? 
कधी कधी वाईट विचारांचाही करावा
कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, 
कधी उपवास मीपणाचाही करावा
स्वामी समर्थ भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
 
मी सर्वत्र आहे. 
मी चराचरा व्यापून आहे. 
मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. 
गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरूडावरही मीच आहे. 
मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठिशी आहे. 
श्री स्वामी समर्थ
स्वामी समर्थ भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
 
निःशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना। 
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी 
स्वामी समर्थ भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
 
श्रीस्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद सर्वांवर राहो 
आणि त्यांच्या चरणी भक्ती वाढत राहो, हीच प्रार्थना
स्वामी समर्थ भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
 
विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, 
तिथून साथ देतो मी, 
स्वामी समर्थ भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
 
भक्त वत्सल खरा तू एक होसी, 
म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी 
स्वामी समर्थ भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा