गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जुलै 2020 (12:53 IST)

Guru Purnima 2020 : या दिवशी सत्यनारायण कथेचं महत्त्व का?

गुरुपौर्णिमेचा सण दर वर्षी आषाढ महिन्यात येत असून मान्यतेनुसार या दिवशी शंकराने आपल्या पहिल्या सात शिष्यांना ज्ञान दिले होते. हिंदू धर्मात भगवान विष्णूंना जगाचे गुरु मानले आहे. ते आपल्या वेगवेगळ्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतात आणि त्याच बरोबर मानवाला जीवनाचा खरा अर्थ सांगतात. 
 
गुरुपौर्णिमेला भगवान सत्यनारायणाच्या कथेच महत्त्व आहे. असे म्हणतात की या दिवशी सत्यनारायणाची कथा केल्याने माणसाच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात. या कथेच्या पठणाने मिळणारा आशीर्वाद खूप सामर्थ्यवान असतो. याचा द्वारे गृहशान्ती असो, किंवा आनंद -सौख्य प्राप्ती असो, माणसाला सर्व गोष्टींचा आशीर्वाद मिळतो. 
 
सत्यनारायणाचे पठण सर्व शुभ कार्याच्या पूर्वी केलं जात. यामुळे सर्व दुःख नाहीसे होतात. सत्यनारायण भगवानाच्या आशीर्वादाने माणसाला सिद्धी प्राप्त होते. त्याचा घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता होत नाही. सत्यनारायण भगवान आपल्या भक्तांवर आलेले सर्व संकट नाहीसे करतात. 
 
सत्यनारायण कथेच्या पठण करण्यासाठी गुरु पौर्णिमेचा दिवस सर्वोत्तम मानला आहे. 
 
सत्यनारायण भगवानाची कथेचे पठण माणसाच्या सर्व त्रासांना दूर करून यश देतं. याने बृहस्पती ग्रहाचे परिणाम देखील दूर होतात. अशी आख्यायिका आहे की माणसामध्ये सत्य जागृत करण्यासाठी सत्यनारायणाचे पठण करणं खूप महत्त्वाचे आहे.
 
सत्यनारायण कथेचा सर्वात महत्त्वाचा उपदेश असा आहे की जर एखादी व्यक्ती सत्य आणि निष्ठेला आपल्या जीवनाचा मूल्य बनवून घेत असेल तर त्याला कोणत्याही लोकात दुःख सोसावे लागणार नाही. 
 
सत्यनारायणाच्या पूजेनंतर ब्राह्मण जेवणाचे महत्त्वाचे मानले गेले आहे. मान्यतेनुसार हिंदू धर्मामध्ये ब्राह्मणाला देवाच्या सर्वात जवळचे मानले गेले आहे. ब्राह्मण तो असतो जो या जगाला ईश्वररुपी गुरुबद्दल सांगतो. ते जगातील सर्व विद्यांचे जाणकार आहेत. म्हणून ब्राह्मणाला जेवू घालणे म्हणजे साक्षात ईश्वराला स्वतःच्या दारी जेवणासाठी आमंत्रित करणं असतं.