मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 6 एप्रिल 2020 (11:02 IST)

चैत्र पौर्णिमा 2020 : या पौर्णिमेला हे 5 कार्य करा, पुण्य लाभेल

चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला आहे. त्यामुळे ही पौर्णिमा खासच आहे. चैत्र पौर्णिमेला चैती पूनम देखील म्हणतात. या दिवशी हे 5 कार्य केल्याने काही विशेष लाभ होतात. त्या बद्दलची माहिती घेऊ या.
 
1 या दिवशी सत्यनारायणाची उपासना करावी. घरात सत्यनारायणाचे पूजन करावे त्यांची कहाणी ऐकावी आणि वाचावी. भगवान सत्यनारायणाची कृपादृष्टी मिळविण्यासाठी  या दिवशी उपवास ठेवावा. असे केल्याने घरात सुख आणि समृद्धी वाढेल.
 
2 या दिवशी रात्री चंद्राची पूजा केली जाते. कुंडलीत असलेला चंद्राचा दोष नाहीसा होतो.
 
3 उत्तर भारतात चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. मारुती(हनुमानाची) पूजा केल्यास त्यांची कृपादृष्टी मिळते आणि सर्व संकट नाहीसे होतात.
 
4 या दिवशी नदीमध्ये स्नान किंवा पवित्र तळात स्नान केल्याने पुण्याची प्राप्ती होते. या दिवशी दान-धर्म, होम -हवन आणि उपास केल्याने लाभ होतो. थोर गरिबांना दान करायला हवे.
 
5 अशी आख्यायिका आहे की या दिवशी श्रीकृष्णाने ब्रजमध्ये महाराजांची निर्मिती केली होती. या दिवशी त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवतात. 
 
पौर्णिमेच्या व्रत कैवल्य आणि पूजनाचे नियम-
सकाळी अंघोळ केल्यावर सूर्याला मंत्र म्हणून अर्घ्य द्यावे. सत्यनारायणाची कहाणी पूजा केल्यावर ऐकावी. मारुती आणि श्रीकृष्णाचे पूजन केल्यावर रात्री चंद्र देवाची पूजा केल्यावर पाणी वाहून घोर गरिबाला जेवू घालावे, देऊळात दान-धर्म करून व्रताची सांगता करावी.
 
चेतावणी- 
या दिवशी कोणत्याही प्रकाराचे तामसिक वस्तूंचे सेवन करणे टाळावे. मद्यपान सारखे नशांपासून दूर राहावे. नाहीतर यांचा दुष्परिणाम आपल्या शरीरावरचं नव्हे तर आपल्या भविष्यावरसुद्धा त्याचे विपरीत परिणाम पडू शकतात.