गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जय हनुमान
Written By
Last Modified: गुरूवार, 6 एप्रिल 2023 (08:21 IST)

Hanuman Jayanti 2023 Wishes In Marathi:हे अंजनी च्या सुता, आज तुझा असे जन्मोत्सव

हे अंजनी च्या सुता, आज तुझा असे जन्मोत्सव,
चिरंजीवी असशी तू,त्याचाच हा उत्सव,
बालकांपरी निर्मळ मन तुझं रे आहे,
राम भक्तीची निर्मळ गंगा नित्यची वाहे,
रुद्राचा अवतार , तू ही असशी भोळा तसाच,
श्रीराम निष्ठा सर्व श्रेष्ठ तुज, त्यावर शंका नकोच,
सेवा हाच धर्म तुझा हनुमंता, दिधली रामचरणी,
मोत्या मध्ये दिसले न प्रभू, डोळ्यांत रे पाणी,
हृदयी दर्शन श्रीराम-जानकी चे, क्षणात दिसले,
म्हणून च श्री हनुमानाच्या आधी श्रीरामाचे नाम आले!
...अश्विनी थत्ते.