मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. हनुमान जयंती
Written By

या प्रकारे करा हनुमानाची सेवा, प्रत्येक संकट मिटेल, अपार सुख मिळेल

कलिकाळ यात हनुमानाची भक्ती सांगितली गेली आहे. हनुमानाची सातत्याने भक्ती केल्याने भूत पिशाच्च, शनी आणि ग्रह बाधा, आजार- शोक, कोर्ट-कचेरी, जेल बंधनापासून मुक्ती तसेच मारण-संमोहन-उच्चाटन, घटना-अपघात याहून बचाव, मंगल दोष, कर्जापासून मुक्ती, बेरोजगार आणि ताण, चिंता याहून मुक्ती मिळते.
 
हनुमान सर्वशक्तिमान आणि सर्वोच्च देव आहे. त्याची भक्ती, पूजा किंवा सेवा याचे देखील काही नियम आहे. ही भक्ती, पूजा किंवा सेवा त्यांनाच फलीभूत होते जे नियमाने भक्ती आराधना करतात. नियम सोपे आहेत पण पाळणे महत्त्वाचे आहे. या नियमानुसारच कोणत्याही परक्या स्त्रीवर वाईट नजर ठेवू नये, व्याजाचा धंधा करू नये, कोणाचाही हक्क मारू नये, कोणाच्याही हृदयाला टोचेल असे वागू नये, ईश्वर, धर्म आणि देवतांची आलोचना करून नये. नेहमी स्वच्छ राहावे पवित्र राहावे. खोटं बोलणे, शिव्या देणे या सवयी सोडाव्या. तसेच कुटुंबातील सदस्यांशी चांगला व्यवहार करावा. या व्यतिरिक्त आम्ही आपल्या 10 असे उपाय सांगत आहोत ज्याने हनुमानाची आराधना सफळ ठरेल. यासाठी सर्वात आधी आपल्याला घरात हनुमानाची मूर्ती किंवा चित्र प्रतिष्ठित करायचे आहे.
 
1. दररोज एकाच स्थानावर बसून हनुमान चालीसा पाठ करावा.
 
2. दररोज हनुमानासमोर चमेलीच्या तेलाने तीनमुखी दिवा लावावा.
 
3. इच्छेप्रमाणे हनुमानाला शेंदुरी लेप करावे. विडा अर्पित करावा आणि गूळ-चण्याचा नैवेद्य दाखवावा.
 
4. 'ॐ श्री हनुमंते नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करावा किंवा साबरमंत्र सिद्ध करावे.
 
5. महिन्यातून एकदा सुंदरकांड आणि बजरंगबाण पाठ करावा.
 
6. सिद्ध केलेला हनुमानाचा कडा घालावा. कडा पितळाचा असावा.
 
7. हनुमानाला मंगळवार, शनिवार किंवा हनुमान जयंतीला केशरी बुंदीचे लाडू, इमरती, बेसनाचे लाडू, चूरमा, मालपुआ किंवा लोणी-साखरेच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा.
 
8. हनुमानासोबत प्रभू राम, लक्ष्मण आणि जानकी मातेचे पूजन देखील करावे.
 
9. प्रत्येक मंगळवारी व्रत ठेवून विधिवत रूपाने हनुमानाची पूजा करावी.
 
10. आपल्यावर घोर संकट असल्यास आपल्याला हनुमानाची पूर्ण भक्तिभावाने आराधना केली पाहिजे. आपल्याला मास, मदिरा आणि इतर सर्व प्रकाराचे व्यसन त्यागून ब्रह्मचर्याचे पालन करत दररोज विधी-विधानाने हनुमानाची पूजा केली पाहिजे आणि हनुमान मंत्राचे जप केले पाहिजे.