1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. aaji soniyacha dinu lyrics in marathi

अजि सोनियाचा दिनु

" अजि सोनियाचा दिनु ।
वर्षे अमृताचा घनु ॥१॥
 
हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥
 
दृढ विटे मन मुळी ।
विराजित वनमाळी ॥३॥
 
बरवा संतसमागमु ।
प्रगटला आत्मारामु ॥४॥
 
कृपासिंधु करुणाकरू ।
बाप रखमादेविवरू ॥५॥
 
रचना - संत ज्ञानेश्वर
संगती - पं. हृदयनाथ मंगेशकर
गायिका - लता मंगेशकर
पुढील लेख
Matra Navami Shradh 2023 नवमीचे श्राद्ध, मातृ नवमी