गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi

ganesha idol
वंदन तुला गणरायाला
हात जोडून वरद विनायकाला 
प्रार्थना करुया गजाननाला
सुखी ठेव नेहमी सर्वांना
अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा
 
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:| 
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| 
सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा
 
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
विघ्न विनाशक मोरया तू
संकटी रक्षी शरण तुला मी
गणपती बाप्पा मोरया
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
 
वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी 
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
 
अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा || 
गणपती बाप्पा मोरया
 
अंगारकी निमित्त तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो 
सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो
हिच बाप्पा चरणी प्रार्थना
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
 
गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमूर्ती श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
 
प्रथम तुला वंदितो गणराया
तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया
तेजस्वी, प्रसन्न अशी तुझी काया
सदैव राहो आम्हावर तुझी प्रेमळ माया
अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा
 
बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो 
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
 
एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात्
अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा
 
ओम गं गणपतये नमो नमः 
श्री सिद्धीविनायक नमो नमः 
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 
मोरया मोरया मी बाळ तान्हे 
तुझीच सेवा करू काय जाणे 
अन्याय माझे कोट्यान कोटी 
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा