आठवतात ते भुलाबाई चे गाणे
आली आज कोजागिरी पौर्णिमा,
आठवणी कितीतरी मनात आहेत जमा,
आठवतात ते भुलाबाई चे गाणे,
मैत्रिणी सोबत या घरून त्या घरी जाणे,
चिक्कार गाणी म्हणायची ताला सुरात,
मग यायची खिरापत आमच्या पुढ्यात,
ओळखावं लागत असे, काय आहे डब्यात ते,
वेगगवेगळी जिन्नस खायला मिळायचे, आनंदाचे दिवस ते,
कुणी तुळशीपाशी अंगणात, तर कुणी घरात,
जिथं भुलाबाई, तिथं पोहोचे आमची वरात,
दोन दिवस असेच जायचे भुर्रर्र उडून,
आठवणी रम्य त्या, आठवतात अजून!
...अश्विनी थत्ते