मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (10:39 IST)

Mandir Mystery : या मंदिरातील खांबांमधून येतो गाण्यांचा आवाज, रहस्य उलगडण्यासाठी इंग्रजांनी कापला होता खांब

आपल्याला माहीत आहे की भारतात शेकडो आश्चर्यकारक आणि रहस्यमय मंदिरे आहेत. आपण त्यापैकी काही मंदिरे पाहिली असतील. तर या वेळी आम्ही तुम्हाला सांगू की भारताच्या कर्नाटक राज्यातील हम्पी येथे असलेल्या विरुपाक्ष मंदिराचे रहस्य. त्याचे रहस्य जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. चला तर मग जाणून घेऊया त्याचे रहस्य काय आहे?
 
1. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट: विरुपाक्ष मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट आहे.
 
2. विष्णूजींना इथेच राहायचे होते: ही एक लोकप्रिय धारणा आहे की भगवान विष्णूंनी या स्थानाला त्यांच्या मुक्कामासाठी खूप मोठे असल्याचे मानले आणि ते आपल्या घरी क्षीरसागरला परतले.
 
3. मंदिराचे गोपूर 500 वर्षांपूर्वी बांधले गेले: 1509 एडी मध्ये, राजा कृष्णदेव राय यांनी येथे गोपुरचे निर्माण केले. या विशाल मंदिराच्या आत अनेक छोटी मंदिरे आहेत, जी खूप प्राचीन आहेत. तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेकडील हेमकूट डोंगराच्या पायथ्याशी बांधलेल्या या मंदिराचे गोपुरम 50 मीटर उंच आहे.
 
4. शिव आणि पंपा : हे मंदिर शिवजीच्या रुपात भगवान विरुपाक्ष आणि त्यांची पत्नी देवी पंपा यांना समर्पित आहे. म्हणून हे मंदिर पंपावती मंदिर या नावाने देखील ओळखलं जातं.
 
5. मंदिरातील खांबांमधून येतो संगीताचा आवाज : असे म्हटले जाते की विरुपाक्ष मंदिरात असे काही खांब किंवा स्तंभ आहेत ज्यातून संगीत ऐकू येतं. म्हणूनच त्यांना 'संगीत स्तंभ' म्हणूनही ओळखले जाते.
 
6. रहस्य उलगडण्यासाठी इंग्रजांनी कापला होता खांब : एकदा ब्रिटिशांना खांबांमधून संगीत कसे बाहेर आले हे जाणून घेण्यासाठी त्यांना कापून पाहिले, परंतु आतले दृश्य पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले कारण आत काही नव्हते. खांब पोकळ होता.
 
7. मंदिराचा बहुतेक भाग पाण्यात बुडालेला : मंदिराचा मोठा भाग पाण्याखाली बुडाला आहे, त्यामुळे तिथे कोणी जात नाही. बाहेरील भागाच्या तुलनेत मंदिराच्या या भागाचे तापमान खूप कमी असतं.
 
8. दक्षिणेकडे वाकलेलं आहे शिवलिंग : विरुपाक्ष, भगवान शिवाचं एक रूप आहे. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंग, जे दक्षिणेकडे झुकलेले आहे. या शिवलिंगाची कथा रावणाशी संबंधित आहे.