गुरूवार, 7 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (13:58 IST)

अशा घरात सुखी राहतं कुटुंब

सुखी संसारासाठी मनुष्याच्या जीवनात अनेक गोष्टीचं महत्त्वं असतं. चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात याबद्दल खूप काही सांगितले आहेत. त्यांनी आपल्या एका श्लोकात म्हटले आहे की - 
 
सानन्दं सदनं सुताश्च सधिय: कांता प्रियालापिनी इच्छापूर्तिधनं स्वयोषितिरति: स्वाज्ञापरा: सेवका:।
आतिथ्यं शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधो: संगमुपासते च सततं धन्यो गृहस्थाश्रमः।। 
 
अर्थात अशा लोकांचं घर सुखी असतं ज्यांची संतान बुद्धिवान असेल, ज्यांची पत्नी मृदभाषी अर्थात मधुर वाणी बोलणारी असेल, ज्याकडे परिश्रम असेल, ईमानदारीने कमावलेला पैसा असेल, चांगले मित्र असतील आणि पत्नीच्या प्रती स्नेह असेल, नोकर आज्ञा पाळत असतील. 
 
ज्या घरात पाहुण्यांचा सन्मान होत असेल, कल्याणकारी परमेश्वराची उपासना होत असेल, घरात दररोज गोडाधोडाचे भोजन आणि पेय व्यवस्था असेल, सदैव सज्जन पुरुषांची संगत असेल, असे गृहस्थ आश्रम धन्य आहे, प्रशंसनीय आहे.
 
आर्दश गृहस्थाचे स्वरुप कसे असावे याबद्दल चाणक्या यांनी या श्लोकात स्पष्ट संकेत दिले आहे.