रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (09:27 IST)

Vishwakarma Jayanti विश्वकर्मा पूजा विधी

विश्वकर्मा हे देवतांचे कारगीर असल्याचे समजले जातं. हिंदू धर्मानुसार जगाचे रचयिता किंवा आधुनिक शब्दात सांगायचे तर विश्व निर्माण करणारे पहिले इंजीनियर प्रभू विश्वकर्मा होय. देवतांचे शिल्पकार म्हणून यांची ओळख असून प्रभू विश्वकर्मा यांनीच देवतांचे अस्त्र-शस्त्र, महल, स्वर्ग, इंद्रपुरी, यमपुरी, महाभारत काळाची द्वारिका, त्रेतायुगाची हस्तिनापुर आणि रावणाच्या लंकेच निर्माण केलं होतं. प्रभू विश्वकर्माबाबत “ देवतांचा कारागीर’ असे संबोधले जात असले तरी वेद, पुराण, उपनिषदे, व इतर ग्रंथांप्रमाणे प्रभू विश्वकर्मा केवळ देवतांचे कारागीरच नसून सृष्टिनिर्मितीची बीजे निर्माण करणारे व जड चेतन सृष्टी निर्माण करणारे विश्वनिर्माता आहे.
 
प्रभू विश्वकर्मा यांच्या जन्माबद्दल अनेक कहाण्या प्रचलित असून विश्वकर्मा यांचा जन्म ब्रह्मा यांच्या पुत्र धर्माच्या सातव्या संतान वास्तु देवाच्या 'अंगिरसी' नावाच्या पत्नीद्वारे झाल्याचे मानले गेले आहे.
 
या दिवशी ऑफिस, उद्योग, दुकानदार, फॅक्ट्रीज येथे लागलेल्या मशीन पुजल्या जातात. या दिवशी लोकं आपल्या घरातील वाहन, मोटर आणि इतर वस्तूंची पूजा देखील करतात.
 
या प्रकारे करा विश्वकर्मा पूजा
 
सर्वात आधी पूजा सामुग्री जसे अक्षत, फुलं, मिठाई, रोली, सुपारी, फळं, धूप, रक्षा सूत्र, दही याची व्यवस्था करुन घ्या.
सकाळी लवकर उठून स्नान करुन पांढरे वस्त्र नेसावे.
पूजा घरात प्रभू विश्वकर्मा यांची प्रतिमा किंवा फोटो स्थापित करावी.
त्यावर फुलं, माळ, अपिर्त करा. पिवळे किंवा पांढरे फुलं अर्पित करणे योग्य ठरेल.
तुपाचा दिवा लावावा, उदबत्ती लावावी.
नंतर सर्व शस्त्र, वाहन, मोटर इतर वस्तूंची पूजा करावी. सर्व शस्त्रांना तिलक करुन अक्षत लावून फुलं अर्पित करावे.
देवाला गोडाचा नैवेद्य दाखवावा.
हातात अक्षत, फुलं घेऊन देवाची आराधना करावी.
पूजा करताना या मंत्रांचा उच्चार करावा
।। ऊँ आधार शक्तपे नम: ।।
।। ऊँ कूमयि नम: ।।
।। ऊँ अनन्तम नम: ।।
।। ऊँ पृथिव्यै नम: ।।