शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: रविवार, 23 फेब्रुवारी 2020 (08:57 IST)

दर्श अमावस्येला केले जाणारे उपाय...

आज दर्श अवस आहे. हिंदू शास्त्रात ही शुभ मानली जाते. या अमावास्येला श्राद्ध अमावस्या पण म्हणतात. याचा मागचे कारण असे की या दिवशी चंद्र दर्शन होत नसल्याने आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस चांगला मानला जातो. 
 
अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपले पितर पृथ्वीलोकात येतात. त्यांच्यासाठी जेवणाचे ताट काढून ठेवायला हवे. गाईला गूळ आणि जेवण द्यावे. या दिवशी काही उपाय केल्याने सर्व व्याधी दूर होतात. चला तर मग जाणून घेऊ या काय आहे ते उपाय....
 
आपल्याला व्यवसायात अडचणी येत असल्यास हा उपाय केल्यास व्यवसायाच्या अडचणीतून मुक्ती मिळून व्यवसाय सुरळीत चालेल. यासाठी आपल्याला शनिवारी सकाळी एक लिंबू घेऊन त्याचे 4 भाग करायचे आहे. त्यावर पिवळी मोहरी, 29 काळे मीरे आणि 7 लवंगा घेऊन व्यवसायाच्या ठिकाणी ठेऊन यावे आणि संध्याकाळी या सर्व वस्तूंना काळया कापड्यात बांधून कोरड्या विहिरीत टाकून यावे. असे केल्यास व्यवसाय सुव्यवस्थित चालून धनवर्षा होऊ लागेल. 
 
दर्श अवसेच्या संध्याकाळी घराच्या ईशान कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा कापसाच्या वातीऐवजी लाल दोऱ्याचं वापर करून लावायला हवा. दिव्यात थोडे केसर घालून लावल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. पैश्यांची कमतरता होत नाही. 
 
गाईला हिरवे गवत खाऊ घालायला हवे, सर्व कार्यसिद्धी होते आणि कुशाग्र बुद्धी होते.
 
अवसेला रात्री 12 वाजता मोहऱ्या हातात घेऊन गच्चीवर जाऊन 3 वेळा परिक्रमा करुन ते सर्व दिशात फेकून हा मंत्र म्हणावा - 
ll  ॐ श्री हीं क्लीं महालक्ष्मये नमः ll