गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

दररोज केवळ एक काम, प्रत्येक दिवस सकारात्मक जाईल

आठवड्याचा पहिला दिवस असो वा शेवटला, प्रत्येक दिवस सुखा समाधानाने पार पडावा अशी सर्वांची इच्छा असते. प्रत्येक दिवस सकारात्मकता घेऊन यावा, प्रत्येक दिवशी यश मिळावे असे आपल्यालाही वाटत असेल तर आपल्याला केवळ 7 उपाय आज आम्ही येथे सांगणार आहोत. सात उपाय म्हणजे प्रत्येक वारी करण्यासाठी एक उपाय आणि आपण बघाल या उपायांमुळे आपलं जीवन आनंदी होऊन जाईल. तर जाणून घ्या उपायतर आपण आठवड्यात काही विशेष करू इच्छित असाल तरी या उपायांनी सुरुवात करू शकता. याचा प्रभावामुळे यश नक्की मिळेल.
 
सोमवार- सोमवारी यश प्राप्तीसाठी शिवलिंगावर कच्चं दूध अर्पित करावं. असे करणे शक्य नसेल किंवा काही कारणामुळे जमत नसेल तर घरातून निघण्यापूर्वी दूध किंवा पाणी पिऊन घराबाहेर निघावे. सोबतच ॐ श्रां श्रीं श्रौं स: सोमाय नम: मंत्र उच्चारणासह प्रस्थान करावे. जवळ पांढरा रुमाल असू द्यावा.
 
मंगळवार- मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. हनुमानाला तयार विडा आणि लाल फुलं अर्पित करावे. घरातून निघण्यापूर्वी मध चाटावे. आणि ॐ क्रां क्रीं क्रौं स: भौमाय नम: मंत्र उच्चारत प्रस्थान करावे. या दिवशी लाल वस्त्र परिधान करणे योग्य ठरेल तसे शक्य नसल्यास लाल रुमाल जवळ ठेवू शकता.
 
बुधवार- बुधवारी गणपतीला दूर्वा अर्पित कराव्या. गणपतीला गूळ- धण्याचे नैवेद्य दाखवावे. घरातून शेप खाऊन बाहेर पडावे. ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय् नम: मंत्राच जप करावा. हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे किंवा जवळ हिरव्या रंगाचा रुमाल असू द्यावा.
 
गुरुवार- गुरुवारी भगवान विष्णूंच्या मंदिर जावे. श्रीहरीला पिवळे फुलं अर्पित करावे. सोबतच ॐ ग्रां ग्रीं ग्रों स: गुरुवे नम: मंत्राचा जप करावा. पिवळ्या रंगाची मिठाई खाऊन घरातून बाहेर पडावे. पिवळे वस्त्र परिधान करावे किंवा पिवळ्या रंगाचा रुमाल जवळ असू द्यावा.
 
शुक्रवार- यश मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीला लाल फुलं अर्पित करावे. ॐ द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम: मंत्राच जप करावा. घरातून निघताना दह्याचे सेवन करावे. पांढर्‍या रंगाचे कपडे घालावे किंवा जवळ पांढर्‍या रंगाचा रुमाल असू द्यावा.
 
शनिवार- शनिवारी हनुमान मंदिरात जावे. हनुमानाला तयार विडा आणि लाल फुलं अर्पित करावे. ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम: मंत्राच जप करून घरातून बाहेर पडावे. तिळाचे सेवन करावे. निळे वस्त्र परिधान करावे किंवा निळा रुमाल स्वत:जवळ ठेवावा.
 
रविवार- रविवारी सूर्याला अर्घ्य द्यावे. लाल फुलं अर्पित करावे. ॐ ह्रां ह्रीं ह्रौ स: सूर्याय नम: मंत्राचा जप करावा. गुळाचे सेवन करावे. लाल किंवा नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करावे किंवा या रंगाचा रुमाल जवळ असू द्यावा.