बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : रविवार, 14 जून 2020 (16:25 IST)

गरूड पुराणांची 1 गोष्ट लक्षात ठेवल्यास होईल पैशांचा वर्षाव आणि उजळेल भाग्य

गरूड पुराणाबद्दल आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. असे काही नाही की गरूड पुराणामध्ये भीतीच्या किंवा नरकाबद्दलच सांगितले आहे. एखाद्याचा मृत्यू झाल्यावरच गरूड पुराणाचे पठण करतात पण आपण एखाद्या वेळा गरूड पुराण वाचून घ्याल तर आपल्याला त्याचा फायदाच होणार आणि जीवन आणि मृत्यूशी निगडित गोष्टींची माहिती मिळेल.
 
गरूड पुराणामध्ये स्वर्ग, नरक, पाप आणि पुण्याच्या व्यतिरिक्त अजून पण बरेच काही आहे. ज्ञान, विज्ञान, धर्म, धोरण, नियम हे सर्व यामध्ये आहे. गरूड पुराणात एकीकडे मृत्यूचे गूढ आहे तर दुसर्‍या बाजूला जीवनाचे रहस्य देखील दडलेले आहेत.
 
गरूड पुराणातील सहस्र गोष्टींपैकी एक गोष्ट अशी की जर आपणास श्रीमंत, धनी किंवा भाग्यवान व्हायचे असेल तर त्यासाठी आपण स्वच्छ सुंदर आणि सुवासिक कपडे घालावे. 
 
गरूड पुराणानुसार त्या लोकांचे भाग्य नष्ट होतात जे घाणेरडे कपडे घालतात. ज्या घरात अशे लोक असतात की जे घाणेरडे कपडे घालतात त्या घरात लक्ष्मी कधीही येत नाही. ज्यामुळे त्या घरातून भाग्य निघून जातं आणि दारिद्रय तेथे वास करू लागते. 
 
असे दिसून येते की जे लोकं सर्व सुख सोयी आणि संपत्तीने संपन्न असून ही घाणेरडे कपडे घालतात, हळू हळू त्यांची सर्व संपत्ती नष्ट होऊ लागते. म्हणून आपल्याला स्वच्छ आणि सुवासिक कपडे घालायला हवे. जेणे करून श्री महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल.