मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

शनिवार: या उपायाने प्रत्येक कामात यश मिळेल

शनीदेवाचा कोप असल्यास व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरा जावं लागतं. तसेच ज्यांच्यावर शनीदेवाची कृपा असते त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं. व्यक्तीच्या कुंडलीत साडेसाती किंवा ढैया असल्यास यशात अडथळे निर्माण होतात. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही सोपे उपाय शनिवारी केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि बाधांपासून मुक्ती मिळते. तसेच प्रत्येक कामात यश मिळू लागतं.
 
* प्रत्येक शनिवारी काळे तीळ, कणिक, साखर मिसळून घ्या. नंतर हे मिश्रण मुंग्यांना खाऊ घाला.
 
* शनी संबंधित समस्यांपासून मुक्तीसाठी काळ्या घोड्याची नाळ किंवा नावाचे खीळ याने तयार अंगठी मध्यमा बोटात शनिवारी सूर्यास्त काळात धारण करावी.
 
* शनीदोषापासून मुक्तीसाठी शनीदेवाचे दहा नाव जपावे. याने कामात यश मिळतं. शनीदेवाची नावे किमान 108 वेळा जपावी. नावे या प्रकार आहेत-
कोणस्थ, पिंगळ, बभ्रु, कृष्ण, रौद्रान्तक, यम, सौरि, शनैश्चर, मंद, पिप्लाश्रय
 
* या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्ती होते. म्हणून सामर्थ्यनुसार काळे तीळ, काळा कपडा, कांबळे, लोखंडी भांडी, उडिद डाळ दान करावी. याने शनीदेव प्रसन्न होऊन शुभ फळ प्रदान करतात.
 
* माकडांना गूळ व चणे खाऊ घातल्याने हनुमान प्रसन्न होतात. प्रत्येक शनिवारी हनुमान चालीसाचा पाठ करावा. हनुमानाचे पूजन केल्याने व्यक्तीला शनी दोषांचा सामना करावा लागत नाही.
 
* शनीदेवाची पूजा करुन त्यांना निळ्या रंगाचे फुलं अर्पित करावे. यासोबतच रुदाक्ष माळ घेऊन ऊँ शं शनैश्चराय नम: मंत्र किमान 108 वेळा जपावा. प्रत्येक शनिवारी असे केल्याने साडेसाती आणि ढैय्या पासून मुक्ती मिळते.
 
* सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर एका वाटीत तेल घेऊन आपला चेहरा बघावा. नंतर तेल गरजू व्यक्तीला दान करावे. याने शनी देव प्रसन्न होतात आणि भाग्य संबंधी अडचणी दूर होतात.
 
* सकाळी उठल्यावर पिंपळाला पाणी घालावे. सात प्रदक्षिणा घालाव्या. सूर्यास्तनंतर सुनसान जागी असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा. असे शक्य नसल्यास मंदिराजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली देखील दिवा लावू शकता.
 
* तांब्याच्या लोट्यात पा‍णी घेऊन त्यात तीळ मिसळावे. नंतर हे पाणी शिवलिंगावर अर्पित करावे. असे केल्याने व्यक्तीला सर्व आजरांपासून मुक्ती मिळते आणि आर्थिक अडचणी देखील दूर होतात.