रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Totake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके

मुख्यता: गुलाबाच्या फुलाचा रंग पांढरा, गुलाबी आणि लाल असतो. तसे तर आता निळी, काळे आणि इतर विविध रंगाचे गुलाबदेखील बाजारात दिसून येतात. पण गुलाबी रंगाचे फूल अधिक संख्येत मिळत असल्यामुळे याला गुलाब म्हटलं जातं.
 
गुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके आपले जीवन सुखी करू शकतं हे बहुतेकच कोणालाही माहीत असेल. म्हणूनच पाहू या गुलाबाच्या फुलाचे काही सोपे टोटके: 
मनोकामना पूर्तीसाठी: कोणत्याही शुक्ल पक्षाच्या पहिल्या मंगळवारी ताजे 11 गुलाबाचे फुल हनुमानाच्या मूर्तीवर चढवावे. सलग 11 मंगळवार असे केल्याने आपली मनोकामना पूर्ण होईल.

अचानक धन प्राप्तीसाठी: एखाद्या संध्याकाळी गुलाबाच्या फुलात कापुराचा तुकडा ठेवून जळावा. कापूर जळाल्यावर ते फूल देवीला चढवावे.

तिजोरीत भरभराटीसाठी: घरात भरभराटीसाठी मंगळवारी लाल चंदन, लाल गुलाब आणि लाल दोरा एका लाल कापड्यात बांधून घ्यावा. ही पोटली एका आठवड्यासाठी मंदिरात ठेवावी. एक आठवड्यानंतर ती घरातील किंवा दुकानातील तिजोरीत ठेवून द्यावी. या उपायाने पैसा टिकून राहील.

रोगाला मात करण्यासाठी: जर घरातील एखाद्या सदस्याचा आरोग्यात सुधार होत नसल्यास एक अखंड पान, गुलाबचे फूल आणि थोडे बत्तासे रूग्णावरून 31 वेळा ओवाळून चौरस्त्यावर ठेवून द्या.

ऋण मुक्तीसाठी: अखंड पाकळ्या असलेले पाच गुलाब आणावे. सव्वा मीटर पांढरा कापड पसरवून गुलाबाचे चार फूल चारी कोपर्‍यावर बांधून द्यावे. नंतर पाचवा गुलाब मध्यभागी ठेवून गाठणं बांधावी. नंतर ह्याला नदीत प्रवाहीत करून द्यावे.
पाच गुलाबाचे फूल, एक चांदीचे पान, जरासे तांदूळ, गूळ घेऊन एका पांढर्‍या रुमालात ठेवावे. कोणत्याही सोमवारी लक्ष्मी- विष्णूंच्या मंदिरात जाऊन रुमालात ठेवलेल्या वस्तू हातात घेऊन 21 वेळा गायत्री मंत्राच जप करावा. प्रत्येक जपानंतर माझी समस्या दूर हो, मी कर्ज मुक्त होऊन जावो, अशी प्रार्थना करावी. नंतर सर्व सामुग्री एकत्र करून वाहत्या पाण्यात प्रवाहीत करावी. ही प्रक्रिया किमान 7 सोमवारी केली पाहिजे. 

मुले आजारी असतील तर: जर आपले मुलं आजारी आहे, काही खाल्ल्या उलटी करत असेल तर एक पानावर बुंदीचा लाडू, पाच गुलाबाचे फूल ठेवून मुलावरून सात वेळा ओवाळून एखाद्या मंदिरात ठेवून या. 

अडथळे दूर होतील: कार्य पूर्ण होण्यात अडथळे येत असल्या पौर्णिमाच्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यावर 3 गुलाब आणि 3 बेला किंवा जाईचे फुलं नदीत विसर्जित करावे. सलग पाच पौर्णिमा असे केल्याने चांगले परिणाम समोर येतील.

नोकरीसाठी: मंगळवारापासून सुरू करून 40 दिवसापर्यंत रोज सकाळी नंग्या पायाने हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाला लाल गुलाब चढवावे. अस केल्याने शीघ्र नोकरी मिळेल.

धन प्राप्तीसाठी: पानात गुलाबाच्या पाकळ्या ठेवून ते पान दुर्गा देवीला चढवावे. धन प्राप्ती होईल.