रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 (13:25 IST)

21 नोव्हेंबर रोजी गुरूपुष्यामृतयोग

guru pushya guru grah
Guru Pushya Amrit Yoga 2024 या वर्षातील शेवटचा पूर्णकालिक गुरु पुष्य योग गुरुवार, 21 नोव्हेंबर रोजी असेल. या दिवशी गुरुवारसोबत पुष्य नक्षत्राचा योग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राहील, त्यामुळे हा पूर्णकाल योग अत्यंत फलदायी मानला जातो.
 
गुरूपुष्यामृतयोग मुर्हूत
21 नोव्हेंबर 2024 गुरुवार रोजी सकाळी 06.30 मिनिटापासून ते दुपारी 03.34 मिनिटापर्यंत.
 
या योगामध्ये रवियोग आणि अमृत सिद्धी योग यांचाही मिलाफ आहे, ज्यामुळे तो अधिक फलदायी होतो. हा विशेष योग स्थैर्य प्रदान करणार असून या दिवशी पिवळे धातू, पिवळे धान्य, पिवळे कपडे, शुभ कार्यासाठीच्या वस्तू, धार्मिक साहित्य, पुस्तके, साहित्य, सामाजिक-धार्मिक कार्यासाठी संकल्प आदी वस्तू खरेदी करणे शुभ राहील.
 
चार शुभ योग चौपट फळ देतील
गुरु पुष्य नक्षत्राचा हा महा मुहूर्त विशेषतः खरेदीमध्ये स्थिरता देईल, जे लग्न आणि शुभ कार्यांसाठी योग्य मानले जाते.
 
या दिवसाचे चार शुभ योग - गुरु पुष्य योग, रवि योग, अमृत सिद्धी योग आणि शुभ योग, चौपट फल प्रदान करतील. जमीन, वास्तू, सोने, पितळी मूर्ती, मंदिरे आणि पूजा साहित्य खरेदीसाठी हा दिवस अत्यंत फायदेशीर ठरेल.
 
गुरु पुष्य योग असेल त्या दिवशी महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि धन संबंधी समस्या सोडविण्यासाठी लक्ष्मी नारायणाची पूजा करावी. पूजेत 'ॐ श्री ह्रीं श्रीं दारिद्रय‍ विनाशिन्ये धनधान्य समृद्धी देहि देहि नम:' मंत्राचा कमलगट्ट्याच्या माळेने 108 वेळा जप करावा. शुभ योगात लक्ष्मी मंत्र जप केल्याने धन प्राप्तीचे योग बनतात.