गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : रविवार, 1 जानेवारी 2023 (17:34 IST)

दान देत असाल तर ह्या नऊ नियमांचे करा पालन

dan
प्रत्येक धर्मात दानाची महत्ता मानली आहे. पण दान देण्याचेही काही नियम आहे. त्या नियमांप्रमाणे दान केल्याने पुण्य मिळतं.
1. माणसाने आपल्याद्वारे प्रामाणिकपणे कमावलेल्या कमाईचा दहावा भाग सत्कर्मांमध्ये लावाला हवा. जो मनुष्य आपल्या पत्नी, पुत्र आणि कुटुंबाला दुखी करून दान करतो, तो जीवितपणे आणि मृत्यूनंतरही दुखी राहतो.
 
2. स्वत: जाऊन दिलेले दान उत्तम आणि घरी बोलवून दिलेले दान मध्यम फलदायी असतं. गाय, ब्राह्मण आणि रूग्णाला दान देताना दान देऊ नये असा सल्ला देणारा दुखी राहतो.
 
3. तीळ, कुश, पाणी आणि तांदूळ हे हातात घेऊन दान केले पाहिजे अन्यथा या दानावर दैत्य अधिकार करून घेतात. पितरांना तिळाबरोबर तर देवांना तांदुळाबरोबर दान केले पाहिजे.
 
4. दान करणार्‍यांनी पूर्वाभिमुखी होऊन दान केले पाहिजे आणि घेणार्‍यांना उत्तराभिमुखी होऊन दान ग्रहण करायला हवे. असे केल्याने दान देणार्‍याचे आयुष्य वाढतं आणि घेणार्‍यांचे आयुष्य क्षीण होत नाही.
 
5. दीन, निर्धन, अनाथ, मूक, विकलांग आणि रोगी मनुष्याच्या सेवेसाठी जो धन खर्च करतो त्याचा पुण्य महान ठरतं.
 
6. अन्न, पाणी, अश्व, गाय, वस्त्र, शय्या, छत्र आणि आसन या आठ वस्तूंचे दान मृत्यूनंतर येणार्‍यां कष्टांपासून मुक्ती देतं.
 
7. गाय, घर, वस्त्र, शय्या आणि कन्या हे दान एकाच व्यक्ती केले पाहिजे. रुग्णांची सेवा करणे, देवतांचे पूजन करणे आणि ब्राह्मणांचे पाय धुणे हे गाय दान समांतर आहे.
 
8. विद्याहीन ब्राह्मणांना दान देऊ नये. याने ब्राह्मणाला हानी होते.
 
9. गाय, सोने, चांदी, रत्न, विद्या, तीळ, कन्या, हत्ती, अश्व, शय्या, वस्त्र, भूमी, अन्न, दूध, छत्र आणि आवश्यक सामुग्रीसह या 16 वस्तू दान करणे महादान मानले जातात.