मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जून 2021 (07:21 IST)

हिंदू धर्मात लाल रंग का महत्वाचा आहे, जाणून घ्या 12 खास गोष्टी

शास्त्रज्ञांच्या मते, मुळात काळा, पांढरा, लाल, निळा आणि पिवळा असे पाच रंग आहेत. काळा आणि पांढरा आपण याला रंग म्हणत असलो तरी हे रंग नाहीत. या प्रकारे तीनचं रंगउरतात- लाल, पिवळा आणि निळा. आपण अग्नी जळत असताना लक्ष दिलं असेल तर हेच तीन रंग दिसून येतात. हिंदू धर्मातही या तीन रंगांच महत्त्व आहे, कारण यात हिरवा, केशरी आणि नारंगी रंग सामील आहेत. लाल रंगात केशरी, शेंदुरी रंग येतात.
 
लाल रंग :
1.  हिंदू धर्मानुसार, लाल रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे. लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे.
 
2. हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे.
 
3. हिंदू धर्मात विवाहित महिला लाल रंगाची साडी आणि हिरव्या बांगड्या घालते.
 
4. निसर्गात लाल रंगाची फुले किंवा त्याच्या रंगसमूहाचे अधिक प्रकार आढळतात.
 
5. देवी लक्ष्मीला लाल रंग आवडतो. मां लक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते.
 
6. रामभक्त हनुमानाला देखील लाल व शेंदुरी रंग प्रिय आहे. याच कारणामुळे भक्त हनुमानाला शेंदुर अर्पित करतात.
 
7. मां दुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येईल.
 
7. लाल रंगासह केशरी देखील सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे.
 
9. हा रंग चिरंतन, सनातनी, पुनर्जन्माच्या संकल्पना सांगतो.
 
10. लग्नात देखील लाल रंगाच वापर अधिक दिसून येतो. कारण हा रंग मांगळकि कार्यांत शुभ मानला जातो आणि आयुष्यातील प्रगतीशी संबंधित आहे.
 
11. भगवा रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, राम, कृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केशरी रंगाचे होते. केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे.
 
12. सनातन धर्मात भगवे रंग त्या मुनी आणि संन्यासींनी घातला आहे, जो मुमुक्षु बनून मोक्ष मार्गावर चालण्याचा निर्धार करतात. असे संन्यासी स्वत: चं आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्यांचे पिंडदान करुन सर्व प्रकारच्या आसक्तींचा त्याग करून आश्रमात राहतात. केशरी वस्त्रांना संयम, दृढनिश्चय आणि आत्मनियंत्रण यांचे प्रतीक मानले जाते.