शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (10:26 IST)

घरातील वातावरण बदलणे सर्वस्वी आपल्याच हातात

स्वयंपाकी बाईपेक्षा घरच्या आईनं केलेला स्वयंपाक अधिक रुचकर लागतो. मुलगा खूप दिवसांनी घरी येणार म्हणून आईनं साध्या पाल्याची केलेली भाजीही किती चवदार लागायची! 'अरे, तूझेच विचार असतात ना रे बाळा, माझ्या मनात?' त्यातील तो भाव असतो, प्रेम असतं ते उतरतं खाण्याच्या पदार्थात. एरवी मीठ मोहरी जिरं तिखट सर्वांचं सारखंच!'
 
असं म्हणतात की एखादी व्यक्ती अत्यंत प्रेमानं ज्यावेळी एखादा पदार्थ बनवते तेव्हा तिच्या हातावरील रेषांमधून अमृताचे झरे वाहून त्या पदार्थाची गोडी किंवा चव अनेक पटीनं वाढते.आणि नामस्मरण करून केलेला स्वयंपाक
तर विचारूच नका... आ..हाह..काय गोडी... कुठल्या ही मसाला किंवा लसूण कांद्याची काहीच गरज नसते....ऐक वेगळीच चव त्या स्वयंपाकात उतरते...म्हणूनच पूर्वीच्या बायका आंघोळ झाली की...जे स्तोत्र म्हणायला सुरुवात करायच्या की संपूर्ण स्वयंपाक होईपर्यंत त्यांचे चालूच असायचे...आणि असे नाही की ऐकच दिवस.. रोजचा नित्यक्रम...आणि आता ही..जे नाम घेऊन स्वयंपाक करतात त्यांच्या घरच्या अन्नाची चव खूपच वेगळी असते...
 
लहानपणी मराठीच्या पुस्तकात एक छोटा धडा होता. पेरूवाल्याकडून पेरू विकत घेऊन त्याच्या फोडी केल्या, प्रत्येकाला एकेक दिली. छोट्या बाबूला ती खूपच आवडली म्हणून ताईनं आपल्यातली अर्धी त्याला दिली. तीही त्यानं मिटक्या मारत खाल्लेली पाहून आईनं आपली पूर्णच फोड त्याला दिली. यावर तो म्हणतो-पेरुची फोड असते गोड. ताईची फोड फारच गोड पण आईची फोड तर गोडच गोड....पेरू तोच होता पण प्रेम अधिकाधिक होत गेलं होतं.
 
उपासनेत आहाराचं फार महत्व आहे. त्यातही आहार बनवताना तो बनवणा-याच्या मनातले भाव जास्त महत्वाचे असतात. 'वासनाशुद्धी' नावाचा आहाराचा एक पैलू आहे. ऐक उदा... नवरा बायको नवीनच असतात....सुरवातीला बायको रोज सगळी कामे करून स्वयंपाक सुद्धा छान बनवते आणि त्यांचे दिवस पण मजेत चाललेले असतात. कुठलीच कुरबुर नाही की, भांडण नाही. मजेत दिवस जात होते.. पण काही दिवसांनी तिला पण जॉब लागला...तरी ती सगळे करून जाऊ लागले..पण मग तिकडे खूपदा वेळ व्हायचा...तेव्हा त्यांनी बाई लावायचे ठरवले...बाई यायची छान पोळ्या करून जायची...पण..काही दिवसांनी...ह्यांच्यात थोड्या थोड्या गोष्टी वरून भांडणे व्हायची...काहीही कारण नसताना घरात वाद व्हायला लागले...हे दोघे ही..शांत झाल्यावर विचार करायचे..की असे का होत आहे..
 
मग ऐका मित्रा जवळ हा विषय काढला...त्यांनी त्यांच्या ओळखीच्या कडे नेले..त्यांनी सगळ्या कडून विचारले...घरात तर दोष नाही की वास्तू झालेला नाही म्हणून ..सगळेच विषया बाबत...आणि शेवटी..जेवण कोण बनविते घरात...हा प्रश्न...मग..त्यांनी सगळे सांगितले पहिल्या पासून..पाहिले कधीच नाही झाले...पण हो.. पोळ्या वाली बाई लावल्या पासूनच होत आहेत..आणि आता तर खूपच होतात...की ती माहेरी जाण्यापर्यंत... मग त्यांनी सगळ विचारले..आणि सांगितले..की ती बाई थोडे दिवस बंद करून बघा...आणि तिचे घरातील वातावरण कसे..थोडी माहिती घ्या...आणि मग पुढे आले हे..
 
की तिचा नवरा तिला खूप मारायचा...दारू पिऊन..त्यांच्या कडे खूप रोजची भांडणे असायायची..ती बाईपण कंटाळली होती..ती पण निघून जाण्याचे विचार करायची..पण मुले..त्या मुळे थांबायची...पण जेवण बनविताना..तिच्या मनात खूप राग असायचा..त्या नवऱ्याबद्दल...तो त्या स्वयंपाकात उतरायचा...खूप रागा रागाने ती ते बनवायची...त्यामुळे हे दोघे ते खाल्या नंतर ह्यांचे पण तसेच भांडणे..व्हायची...
पण गुरुजींनी सांगितल्या नंतर..बाई बंद केल्या वर त्यांचे पुन्हा चांगले सुरू झाले..न.. भांडता... पुन्हा पहिल्या सारखे झाले..तर हा परिणाम होतो स्वयंपाक करताना..म्हणून मन शुद्ध निर्मळ, नाम घेऊनच स्वयंपाक करावा...
 
आईची वासना सर्वात शुध्द असते म्हणून स्वयंपाक करताना तिच्या मनात अत्यंत प्रेमभावना असते. मुलांसाठीचं वात्सल्य असतं. ज्यांच्या घरात नामस्मरण, पूजाअर्चा, सर्वांवर प्रेम, सर्वांच स्वागत, सर्वांची सेवा असं वातावरण असतं त्या घरातलं अन्न पवित्र असतं शुध्द असतं.
 
पू. गोंदवलेकर महाराज म्हणत, 'अशा घरातलं अन्न मागून खावं, त्यामुळे आपली वासनाही शुद्ध होते. आजच्या बाहेरचं खाण्याच्या जमान्यात हा वासनाशुद्धीचा विचारही ध्यानात ठेवलेला बरा.
 
-सोशल मीडिया