रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

पैशांसाठी मध्यमा (मिडिल) सुख-शांतीसाठी रिंग फिंगरने करायला पाहिजे जप

जप करण्यासाठी माळेचा वापर करणे गरजेचे असते. पुराणात सांगितले आहे की बगैर माळेचे जप करणे व्यर्थ आहे. किती दाण्याच्या माळेने जप करणे सर्वोत्तम असते आणि कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्या बोटाने जप करायला पाहिजे या गोष्टीचे पूर्ण वर्णन शिव पुराणात करण्यात आले आहे.    
 
श्लोक-
अष्टोत्तरशंत माला तत्र स्यावृत्तमोत्तमा।
शतसंख्योत्तमा माला पचशद्भिस्तु मध्यमा।।
 
शिवपुरणानुसार ज्याला धन प्राप्तीची इच्छा असेल त्याने मध्यमा अर्थात मिडिल फिंगरने माळा जपायला पाहिजे. 
 
ज्याला मानसिक सुख शांती हवी असेल त्याने अनामिका अर्थात रिंग फिंगरद्वारे माळा जपायला पाहिजे. 
 
जो मनुष्य शत्रूंमुळे त्रस्त असेल त्याने शत्रू मुक्तीसाठी तर्जनी अर्थात इंडेक्स फिंगरने माळा जपायला पाहिजे. 
 
सुखी जीवन आणि मोक्ष प्राप्तीसाठी व्यक्तीने अंगठ्याने माळा जपायला पाहिजे.