शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

काल भैरव जयंती: अष्टमीला 10 पैकी 1 उपाय, वाईट शक्ती दूर होईल

29 नोव्हेंबर अर्थात गुरुवारी काल भैरव जयंती आहे. काल भैरव जयंती अर्थात या दिवशी काल भैरव यांचा जन्म झाला होता. त्यांना प्रसन्न करण्यासाठी आम्ही आज आपल्याला 10 सोपे उपाय सांगणार आहोत. हे उपाय अमलात आणून आपण घरातून नकारात्मकता दूर करू शकता आणि या उपायांनी घरात आनंदाचे वातावरण राहील.  
 
उपाय -1
या दिवशी एक पोळीवर आपल्या मध्यमा किंवा तर्जनी बोटाने तेलाची रेषा काढावी. आता पोळी दोन रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालावी. कुत्र्याने पोळी खाल्ल्यास भैरव आशीर्वाद मिळाला समजावे. कुत्रा पोळीचा वास घेऊन तोंड लावत नसल्यास दररोज पोळी घालत राहावी.  
 
उपाय -2
कडू मोहरीच्या तेलात उडीद डाळीचे भजे तळून रात्रभर घरात ठेवावे. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा दिसेल त्या कुत्र्याला खाऊ घालावे. भजे खायला दिल्यावर मागे वळून न बघता निघून जावे.
 
उपाय -3
भैरव मंदिरात शेंदूर, तेल, नारळ, पुए आणि जिलबी घेऊन जावी. भैरव नाथाचे पूजन करावे. नंतर 5 ते 7 या वयोगटातील मुलांना चणे-चिरंजी, तेल, नारळ, पुए आणि जिलबी प्रसाद म्हणून वाटावी. ज्या मंदिरात अधिक लोकं जात नाही अशा मंदिरात पूजा केल्याने लवकर मनोकामना पूर्ण होईल.
 
उपाय -4
एखाद्या कुष्ठरोगी, भिकाऱ्याला मदिरा दान करावे. ऐकायला विचित्र वाटत असलं तरी भैरव नाथांना मदिरा भोग म्हणून चढवण्यात येते. या निमित्ताने हा उपाय सांगण्यात आला आहे.
 
उपाय -5
काल भैरव जयंतीला सव्वा किलो जिलबी भैरव नाथाला नैवेद्य दाखवावी.
 
उपाय -6
काल भैरव जयंतीच्या दिवशी कडू तेलात पापड, भजी, पुए इतर पक्वान्न तळावे. एक दिवस घरात ठेवून दुसर्‍यादिवशी गरिबांना वाटावे.
 
उपाय -7
या दिवशी भैरव मंदिरात चंदन, गुलाब आणि गुगल अश्या सुवासिक 33 उदबत्त्या लावाव्या.
 
उपाय -8
5 लिंबू काल भैरव जयंतीच्या दिवशी भैरव नाथाला अर्पित करावे. असे केल्याने त्यांची कृपादृष्टी राहते.
 
उपाय -9
या दिवशी सव्वाशे ग्राम काळे तीळ, सव्वा 11 रुपये, सव्वाशे ग्राम काळी उडद हे सव्वा मीटर काळा कपड्यात गुंडाळून ही पोटली भैरव नाथ मंदिरात अर्पित करावी.
 
उपाय -10
काल भैरव मंदिरात जाऊन भगवान काल भैरवाची आरती करावी आणि मंदिरावर पिवळा रंगाचा ध्वज चढवावा.