Dharma Sangrah
✕

कार्तिक माहात्म्य - अध्याय ६

Updated: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:52 IST)
प्रथम तीन बुड्यांनीं मलस्त्रान करावें. नंतर मंत्रस्त्रान करावें. स्त्रिया व शूद्र यांनीं वेदोक्त मंत्र म्हणूं नयेत व त्यांनीं पुराणोक्त मंत्रांनीं स्त्रान करावें ॥१४॥
स्त्रानमंत्रः-- जो भक्तभावन परमेश्वर देवकार्याकरितां तीन रुपांनीं झाला तो सर्व पाप नाश करणारा विष्णु कृपेनें मला पवित्र करो ॥१५॥
सर्व देव विष्णूच्या आज्ञेनें कार्तिकव्रत करणारांचें रक्षण करितात; ते सर्व इंद्रादि देव मला पवित्र करोत ॥१६॥
समख सबीज सरहस्य वेदमंत्र, देव, काश्यपादि ऋषि मला पवित्र करोत ॥१७॥
गंगादि सर्व नद्या, पुष्करादि सर्व तीर्थे, सिंधु आदि नद, सप्तसागरांसह सर्व जलाशय मला पवित्र करोत ॥१८॥
अदिति इत्यादि पतिव्रता, यक्ष, सिद्ध, पन्नग, ओषधी व पर्वत हे तीन लोकांतले सर्व मला पवित्र करोत ॥१९॥
व्रती यानें या मंत्रांनीं स्त्रान करुन हातांत पवित्रक धारण करुन देव, ऋषि, मानव आणि पितर यांचें यथाविधि तर्पण करावें ॥२०॥
कार्तिकमासीं जितके तीळ पितृतर्पणकाळीं असतात तितकीं वर्षेपर्यंत स्वर्गामध्यें पितर वास करितात ॥२१॥
नंतर उदकाशयामधून बाहेर येऊन शुद्ध वस्त्र परिधान करुन प्रातःकालीं करावयास सांगितलेलीं सर्व संध्यादि कृत्यें करुन श्रीहरीची पूजा करावी ॥२२॥
नंतर तीर्थादि देवतांचें स्मरण करुन पुनः भक्तियुक्त अंतः करणानें गंध पुष्प अक्षतांनीं युक्त असें अर्घ्य ॥२३॥
' व्रतिनः ' या मंत्रानें विष्णूला समर्पण करावें ॥२४॥
नंतर वेदामध्यें पारंगत अशा ब्राह्मणांची भक्तीनें गंध, पुष्प, तांबूल इत्यादिकांनीं पूजा करुन वारंवार नमस्कार करावा ॥२५॥
ब्राह्मणांच्या उजव्या पायाचे ठिकाणीं सर्व तीर्थे वास करितात, सर्व वेद मुखाच्या ठायीं वास करितात आणि सर्वांगांत देव वास करितात म्हणून ब्राह्मणांची पूजा केली असतां या सर्वांचें पूजन केल्याप्रमाणें होतें ॥२६॥
कल्याण इच्छिणार्‍या मनुष्यानें ब्राह्मणांचा अवमान करुं नये आणि त्यांशीं विरोध करुं नये; कारण ते अव्यक्तरुप भगवान् विष्णूचींच स्वरुपें होत ॥२७॥
नंतर भगवंताला प्रिय जी तुलसी तिची पूजा करावी. एकाग्र अंतः करणानें प्रदक्षिणा व नमस्कार करावेत ॥२८॥
हे तुलसी, तुला सर्व देवांनीं निर्माण केलें, सर्व मुनींनीं तूं पूजित आहेस. हे विष्णुप्रिये तुलसी ! तुला नमस्कार असो; तूं माझें पातक हरण कर ॥२९॥
नंतर पुराणांतील विष्णुकथा स्वस्थ अंतः करणानें श्रवण कराव्यात पुनः त्या ब्राह्मणांची भक्तीनें पूजा करावी ॥३०॥
याप्रमाणे सर्व व्रतविधि जो भक्तिमान् मनुष्य करतो तो नारायणाच्या लोकाला पावतो ॥३१॥
या लोकीं विष्णूला प्रिय अशा कार्तिक व्रताशिवाय रोग व पातकांचें नाशक, सदबुद्धि देणारें, मुक्तीला कारण असें कोणतेंही व्रत नाहीं ॥३२॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमा० षष्ठोऽध्यायः ॥६॥

सर्व पहा

विजयादशमीच्या दिवशी शिवलिंगाला शमीचे पान अर्पण केल्याने मिळतात हे लाभ

दसऱ्याच्या जेवणात काय बनवावे? बटाट्याची भाजी, पुरी आणि गोड पदार्थांचा खास मेन्यू

कुळधर्म आणि कुलाचार म्हणजे काय? तो का करावा आणि शक्य नसल्यास काय पर्याय असतात?

महाअष्टमीला या ५ वस्तूंचे दान करा, जीवनात सुख, शांती आणि समृद्ध वाढेल

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments