रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (23:00 IST)

Karwa Chauth 2021: राशीनुसार रंगाची निवड करून पूजा केल्याने पती पत्नीमध्ये प्रेम वाढेल

हिंदू धर्मात करवा चौथं हा सण स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला करवा चौथं उपवास साजरा केला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया सूर्योदयापूर्वी सर्गी खातात आणि दिवसभर निर्जल आणि उपवास करतात आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना करतात. रात्री शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते आणि पतीचे आरोग्य, दीर्घायुष्याची कामना केली जाते. महिला चंद्र पाहिल्यानंतर उपवास मोडतात.
 
करवा चौथं हे शास्त्रामध्ये सौभाग्य वाढवण्यासाठी व्रत मानले जाते. ज्योतिषांच्या मते, करवा चौथच्या दिवशी राशीनुसार कपडे घातल्याने वैवाहिक जीवन आनंदी राहते.
1. करवा चौथच्या दिवशी मेष राशीच्या महिलांनी सोनेरी रंगाची साडी, लेहेंगा किंवा सूट घालून पूजा करावी.
2. वृषभ राशीच्या महिलांसाठी सिल्वर रंगाचे कपडे परिधान करणे शुभ राहील.
3. करवा चौथच्या दिवशी मिथुन राशीच्या महिलांनी हिरवे कपडे घालावेत.
4. कर्क राशीच्या महिलांनी करवा चौथचा शुभ रंग लाल असतो.
5. लाल, केशरी किंवा सोनेरी रंगाचे कपडे सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ मानले जातात.
6. करवा चौथच्या दिवशी कन्या राशीच्या महिलांनी लाल, हिरवी किंवा सोनेरी रंगाची साडी परिधान करावी.
7. तुला राशीच्या महिलांनी लाल, सोनेरी किंवा सिल्वर रंगाचे कपडे घालावेत.
8. वृश्चिक राशीच्या महिलांसाठी लाल रंग सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी तुम्ही लाल रंगाचे किंवा सोनेरी रंगाचे कपडे घालून पूजा करू शकता.
9. धनू राशीच्या महिलांना आकाशी किंवा पिवळे कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो.
10. मकर राशीच्या लोकांसाठी निळा रंग शुभ मानला जातो.
11. कुंभ राशीच्या महिला निळ्या किंवा सिल्वर रंगाचे कपडे घालू शकतात.
12. मीन राशीच्या महिलांनी पिवळ्या किंवा सोनेरी रंगाचे कपडे परिधान करून पूजा करावी. असे मानले जाते की असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.