1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. Lord Shani's favorite blue flower remedy

शनिदेवाचा आवडता निळा फूल कोणता? जाणून घ्या खास उपाय

शनिदेवाला निळ्या रंगाची फुले अत्यंत प्रिय आहेत. त्यापैकी 'अपराजिता' (ज्याला गोकर्ण किंवा विष्णूक्रांता असेही म्हणतात) हे फूल शनिदेवाचे सर्वात आवडते फूल मानले जाते. याशिवाय निळी कमळे आणि ब्लू हिबिस्कस (निळे जास्वंद) देखील शनिदेवाच्या पूजेत विशेष मानले जातात.
 
शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि कुंडलीतील शनी दोष, साडेसाती किंवा ढैयाचा प्रभाव कमी करण्यासाठी खालील खास उपाय नक्की करून पहा:
 
शनिदेवाचे आवडते फूल आणि खास उपाय:
अपराजिता फुलांचा उपाय:
दर शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन त्यांना ५ किंवा ११ अपराजिता (गोकर्ण) ची निळी फुले अर्पण करा. यामुळे शनी ग्रहाची पीडा दूर होते आणि रखडलेली कामे मार्गी लागतात.
 
आर्थिक चणचण दूर करण्यासाठी:
शनिवारी एका काळ्या कपड्यात अपराजिताची ३ निळी फुले आणि थोडी काळी उडीद डाळ बांधून ती शनिदेवाच्या चरणी ठेवा आणि नंतर ती आपल्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. यामुळे पैशांची चणचण भासत नाही.
 
मानसिक शांतता आणि प्रगतीसाठी:
शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडापाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शनिदेवाचे स्मरण करत "ॐ शं शनैश्चराय नमः" या मंत्राचा जप करत निळे फूल वाहून नमस्कार करा.
 
नोकरी आणि व्यवसायातील अडचणींवर उपाय:
जर नोकरी किंवा व्यवसायात सतत अडथळे येत असतील, तर शनिवारी वाहत्या पाण्यात ११ निळी फुले प्रवाहित करावीत. यामुळे नशिबाची साथ मिळण्यास मदत होते.
 
About Writer
वेबदुनिया धर्म टीम
वेबदुनिया धर्म टीम विविध धर्मांतील सण-उत्सव, परंपरा आणि अध्यात्मावर आधारित सखोल माहिती वाचकांपर्यंत पोहोचवते. दैनंदिन पंचांग, राशीभविष्य आणि तीर्थक्षेत्रांचा इतिहास रंजक पद्धतीने मांडून लोकांच्या धार्मिक व आध्यात्मिक जिज्ञासेचे समाधान करणे, हे या टीमचे मुख्य काम असते..... आणखी वाचा
पुढील लेख
Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील