सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 5 जुलै 2021 (08:51 IST)

Mahamrityunjaya Mantra महामृत्युंजय मंत्र कसा रचला गेला, आख्यायिका वाचा

Mahamrityunjaya Mantra:महामृत्युंजय मंत्र दीर्घ आयुष्य आणि चांगल्या आरोग्याचा मंत्र म्हणतात. शास्त्रात याला महामंत्र म्हणतात. या मंत्राचा जप केल्याने व्यक्ती निरोगी राहते. चला जाणून घेऊया या महामंत्र का उगम कसा झाला?
 
Mahamrityunjaya Mantra: महामृत्युंजय मंत्राच्या उत्पत्तीविषयी एक आख्यायिका आहे. पौराणिक कथेनुसार, शिवभक्त ऋषी मृकण्डु यांनी संतती मिळवण्यासाठी भगवान शिव यांचे कठोर तप केले. तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान शिवने मृकण्डु आपल्या इच्छेनुसार संतती देण्याचं वर दिलं परंतु शिवने सांगितले हा पुत्र अल्पायु राहील. हे ऐकून ऋषी मृकण्डु स्तब्ध झाले. काही काळानंतर ऋषी मृकण्डु यांना पुत्र रत्न प्राप्त झाले. या मुलाचे वय केवळ 16 वर्षे असेल असे ऋषीमुनींनी सांगितले. ऋषी मृकण्डु दु: खी झाले.
 
महामृत्युंजय मंत्र : ॐ त्र्यम्बकं स्यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
 
 
हे बघून जेव्हा त्यांच्या पत्नीने दु:खाचं कारण विचारलं तर त्यांनी सर्व घटना सांगितली. तेव्हा पत्नी म्हणाली की शिवाची कृपा असेल तर हे विधानही टळेल. ऋषींनी आपल्या मुलाचं नाव मार्कण्डेय असे ठेवले आणि त्यांना शिव मंत्र देखील दिले. मार्कण्डेय शिव भक्तीमध्ये मग्न राहयचे. काही काळानंतर ऋषी मृकण्डु यांनी त्यांच्या पुत्राला अल्पायु असल्याची गोष्ट सांगितली. आणि शिवाच्या कृपेने हे टाळता येऊ शकतं.
 
आई-वडिलांचे दु: ख दूर करण्यासाठी मार्कंडेयांनी शिवापासून दीर्घायुष्याचे वरदान मिळण्यासाठी शिवची पूजा करण्यास सुरवात केली. दीर्घायुष्यासाठी वरदान मिळावे म्हणून मार्कंडेय जी यांनी महामृत्युंजय मंत्राची रचना केली आणि शिव मंदिरात बसून अखंडपणे जप करण्यास सुरुवात केली.
 
शेवटी मार्कंडेयांचा जीव घेण्यास यमदूत आले परंतु त्यांना शिवच्या तपश्चर्यामध्ये डुंबलेले पाहून ते यमराजकडे परत आले आणि सर्व काही सांगितले. मग मार्कंडेयांचा जीव घ्यायला यमराज स्वत: आला. यमराजने मार्कंडेय्यावर आपला पाश घातला तेव्हा बाल मार्कंडेय शिवलिंगाभोवती गुंडाळले गेले. अशा परिस्थितीत चुकून शिवलिंगावर पाश कोसळ्याने यमराजांच्या आक्रमणाने शिव खूप क्रोधित झाले आणि भगवान शिव स्वत: प्रकट झाले. यावर यमराज यांनी त्यांना विधीच्या नियमांची आठवण करून दिली.
तेव्हा शिवांनी मार्कंडेयांना दीर्घायुष्याचा वरदान देऊन विधान बदलला. यासह त्यांनी हा आशीर्वादही दिला की जो कोणी हा मंत्र नियमितपणे जप करतो त्याला कधीही अकाली मृत्यू येऊ शकत नाही.