संत विसोबा खेचर
Saint Visoba Khechar Information : महाराष्ट्र ही संतांची भूमी म्ह्णून ओळखली जाते वारकरी संप्रदायातील सर्व संतांनी भक्ती मार्गाचा संदेश दिला. तसेच वारकरी संप्रदायातील एक आद्यसंत होते संत विसोबा खेचर. संत विसोबा खेचर हे नामदेवांचे गुरू म्हणून परिचित होते. संत विसोबा खेचर हे शैव होते; तसेच त्यांचा वारकरी आणि नाथ पंथांशी जवळचा संबंध होता व नंतर संत विसोबा खेचर हे मूळचे नाथ संप्रदायातील महान योगी होते.
तसेच औंढ्या नागनाथ हे विसोबांचे मूळ गाव असे सांगण्यात येते तसेच पंढरपूरापासून ३६६ किमी दूर औंढ्या नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहे. तसेच संत नामदेवांनी तिथे जाऊन विसोबांची भेट घेतली होती. तेव्हा नामदेवांना साक्षात्कार झाला होता व नामदेवांना विसोबांनी सर्वव्यापी निर्गुण निराकार परमेश्वराची जाणीव करून दिली होती. याकरिता संत नामदेव संत विसोबा खेचर यांना गुरु मानायचे व नामदेवांनी आपल्या अभंगातून विसोबांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे. संत विसोबा खेचर आणि नामदेवांचे नाते गुरुशिष्यापेक्षा मित्रत्वाचे अधिक असल्याचे दिसते. नामदेवांनी विसोबांचा अभंगात गुरू म्हणून उल्लेख केला असला, तरी देखील त्यांनी विसोबांचा योगमार्ग स्वीकारलेला नाही.
संत विसोबा खेचर हे महान संत होते. व संत ज्ञानेश्वर हे संत विसोबा खेचर यांचे गुरु होते विसोबा खेचर संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावांचा द्वेष करायचे एकदा संत मुक्ताबाई संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाकरी भाजत होत्या. तेव्हा संत विसोबा खेचर तिथे होते व हे सर्व पाहून त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या चरणी आपले मस्तक ठेवले व संत विसोबा खेचर संत ज्ञानेश्वर यांना आपले गुरु मानू लागले
एकदा संत नामदेव पांडुरंगाच्या आज्ञेनुसार संत विसोबा खेचर यांना भेट द्यायला गेले. शंकराच्या मंदिरात संत विसोबा खेचर पाय पसरून बसले होते. त्यांनी पिंडीवर पाय ठेवले. तसेच नामदेव महाराजांना माहित नव्हते की संत विसोबा खेचर हे नाटक सादर करताय संत नामदेव महाराज म्हणाले, शिवशंकराच्या पिंडीवर पाय ठेवून बसला आहात असे का करीत आहात आता यावर संत विसोबा खेचर म्हणाले, बाळ माझे शरीर खूप कमकुवत झाले आहे आणि मी हालचाल देखील करू शकत नाही. काही मुलांनी माझे पाय धरले व शिवपिंडीवर ठेवले. माझ्यात पाय ताकद नाहीये. तुम्हीच माझे पाय उचला खाली ठेवा.आता त्यांनी पाय बाजूला सरकवले तर काय चमत्कार शिवाची पिंडी परत एकदा तिथे तयार झाली. ते जिकडे पाय ठेवत असे, पिंडी त्याच दिशेने निर्माण होत असे.हा सर्व चमत्कार पाहून नामदेव महाराज थक्क झाले.
तसेच संत नामदेव महाराजांना अचानक एक तेजस्वी ब्राह्मण दिसला. ते म्हणजे संत विसोबा खेचर होते संत विसोबा खेचर यांनी नामदेव महाराजांच्या कपाळाला स्पर्श केला त्याच क्षणी संत नामदेव महाराजांना सर्वत्र पांडुरंग दिसू लागला. संत नामदेव महाराजांनी संत विसोबा खेचर यांचे पाय धरले त्यांच्या पायावर डोके ठेऊन त्यांना नमस्कार केला
तसेच संत विसोबा खेचर हे बार्शी याठिकाणी राहायचे सोलापूरमधील याच बार्शी येथे विसोबांची समाधी आहे. संत विसोबा खेचर यांनी शके १२३१ सन १३०९ मध्ये समाधी घेतली.
Edited By- Dhanashri Naik