बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (11:35 IST)

Sankashti Chaturthi Wishes संकष्टी चतुर्थी शुभेच्छा

रम्य ते रूप सगुण साकार, 
मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, 
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा 
 
संकष्टी चतुर्थी निमित्त,
आपणास आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा..!
तुमच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना,
श्री गणराय पूर्ण करोत..
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना !
 
सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूती नजरेसमोर दिसावी..
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होई सर्व काम..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
 
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना 
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
 
मोरया मोरया मी बाळ तान्हे 
तुझीच सेवा करू काय जाणे 
अन्याय माझे कोट्यानुकोटी 
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
 
संकष्ट चतुर्थीच्या मंगलदिनी 
तुमच्या मनोकामन पूर्ण होऊ द्या! 
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
 
बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो 
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो, 
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
 
पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस
संकष्टी चतुर्थी बनवा खास 
 
गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी
गणपती बाप्पा मोरया!
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
 
ओम गं गणपतये नमो नमः 
श्री सिद्धीविनायक नमो नमः 
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
भक्ति गणपती, शक्ति गणपती 
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा