गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्री स्वामी समर्थ
Written By
Last Updated : बुधवार, 10 एप्रिल 2024 (15:09 IST)

श्री स्वामी समर्थ अष्टक Shree Swami Samarth Ashtak

|| श्री स्वामी समर्थ अष्टक ||
असें पातकी दीन मीं स्वामी राया |
पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ||
नसे अन्य त्राता जगी या दीनाला |
समर्थां तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || १ ||
 
मला माय न बाप न आप्त बंधू |
सखा सोयरा सर्व तू दीन बंधू ||
तुझा मात्र आधार या लेकराला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || २ ||
 
नसे शास्त्र विद्या कलादीक काही |
नसे ज्ञान, वैराग्य ते सर्वथा ही ||
तुझे लेकरु ही अहंता मनाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ३ ||
 
प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा |
तुझा दास मी ही स्मृती ना मनाला ||
क्षमेची असे याचना त्वत्पदाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ४ ||
 
मला काम क्रोधाधिकी जागविले |
म्हणोनी समर्था तुला जागविले ||
नका दूर लोटू तुझ्या सेवकाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ५ ||
 
नको अंत पाहू त्वरे धाव घेई |
तुझ्यावीण नाही दुजी श्रेष्ठ आई ||
अनाथासि आधार तुझा दयाळा |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ६ ||
 
कधी गोड वाणी न येई मुखाला |
कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला ||
कधी मुर्ती तुझी न ये लोचनाला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ७ ||
 
मला एवढी घाल भीक्षा समर्था |
मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा ||
घडो पाद सेवा तुझ्या किंकराला |
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ८ ||
 
|| श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ||