शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मे 2022 (12:35 IST)

श्री तुळसी माहात्म्य

basil leaves
श्रीगणेशाय नम: ।। गणेश गौरीचा नंदन ।। सिद्धिबुद्धीचा दाता पूर्ण ।।
आधी वंदावा गजवदन । मंगलमूर्ति मोरया ।। १ ।।
मग नमूं शारदा सुंदरी ।। बैसोनि आली हंसावरी ।।
तेणे वळली माझी वैखरी ।। कवित्वालागी ।। २ ।।
मग नमूं सद् गुरूमाउली ।। तेणे मज कृपा केली ।।
काया माझी शीतळ झाली ।। आले हृदयी विज्ञान ।। ३ ।।
मग नमूं व्यासादिक जाण ।। जे चौदा विद्दांचे निधान ।।
त्यासी केले नमन ।। दोन्ही कर जोडूनियां ।। ४ ।।
व्यास सांगे जनमेजयालागुन ।। कथा ऐका पुण्यपावन ।।
तुलसी (तुळसी ) देवीचें आख्यान ।।एकचित्ते श्रवण करावे ।। ५ ।।
तुलसीवृंदावन जयाचे व्दारी ।। धन्य धन्य तो प्राणी संसारी ।।
तयाच्या पुण्या नाही सरी ।। ऐके राया ।। ६ ।।
नित्य जो तुलसीस नमस्कारी ।। त्यासी देखोनि यम पळे दुरी ।।
विष्णुदूत आदर करी ।। तया प्राणियासी ।। ७ ।।
जे प्राणी तुलसीपूजा करिती ।। तुलसीसंगे श्रीहरीची भक्ती ।।
हे वार्ता आहे निश्र्चिती ।। असत्य न म्हणावे ।। ८ ।।
तुलसीदेवीची मंजिरी । अर्पियली श्रीकृष्णाचे शिरी ।।
धन्य धन्य तो प्राणी संसारी ।।ऐसे वदे व्यासऋषी ।। ९ ।।
तुलसीपत्र घालीन कानी ।। तयाचे पातकांची होय धुनी ।।
तो माझा भक्त म्हणे शा र्ड.गपाणी ।। मज आवडी तयाची ।। १० ।।
तुलसीवृंदावनींची मृत्तिका ।। जो कपाळी लावी तिलका ।।
तो भक्त माझा निका ।। म्हणे श्रीकृष्ण ।। ११ ।।