सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते

१. आपली चूक नसताना दुसर्याकडून झालेला त्रास, हे आपलेच प्रारब्ध असते.
 
२. आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते.
 
३. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते.
 
४. यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा. 
 
५. मनुष्य रूपातच बहुतेक गुरू भेटतात, पण कुणाला तरी गुरू मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरू भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. 
 
६. काळ हा परमेश्वरलाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे.
 
७. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही.
 
८. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जगराहाटी चालवावी हेच सांगितले.
 
९. महाराज वैश्विक शक्तीच्या सुचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते.
 
१०. अवतार हे काळाप्रमाणे होतात. दर वेळी एकाच रुपात येत नाहीत. 
 
११. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे पण जगरहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल.
 
।। श्री गुरुदेव दत्त ।।
। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।
श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय ।।
 
 
- सोशल मीडिया