मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 4 डिसेंबर 2024 (13:00 IST)

मल्हारी मार्तंड विजय अध्याय चवथा

श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ विष्णुसहित द्विजवर ॥ कैलासासीं गेले सत्वर ॥ पाहोनि मेरुचें शिखर ॥ मनीं बहुत तोषले ॥१॥
शिलिं प्रतिबिंब पाहोन ॥ किर भिडे तथा लागोन ॥ अनेक परीचे सुमन ॥ घवघवीत आमोद ॥२॥
मंदावर श्वेत करवीरा ॥ जाईजुई बट मोगरा ॥ बकुल चंपक कर्पुरा ॥ कर्दळी प्रसवती ॥३॥
कस्तुरी नाभीचे मृगा ॥ चंदन वृक्ष वेष्टिले उरग ॥ चंपक वृक्षासि भृगंग ॥ कृष्ण चंदनापरि दिसे ॥४॥
चंद्रकांति सुरेख ॥ हिरे रत्न माणिक ॥ प्रतिबिंब पाहोनि शुक्र ॥ फळें म्हणोनि चोंच मारी ॥५॥
कल्पद्रुमाचे तळीं ॥ सम विषम खेळति सिध्द बाळी ॥ सिंहाचीं नखें उमटलीं स्थळीं ॥ घेऊं जातां किरात ठके ॥६॥
पार्वतीसख्या पुष्पें नेती ॥ सुवर्ण कूपीं जळ आणिती ॥ प्रतिबिंब पाहोनि गाल धूति ॥ पति चुंबन केलें ते ॥७॥
बागवेली फणस केळ ॥ रत्नालू कमरक तुतें नारळ ॥ कोहाळवेल सदाफळ ॥ रत्नाकृति झळकति ॥८॥
परोपरीचे झाड ॥ अनेक प्रकार फलगोड ॥ वृक्षीं बैसोनि पक्षी जोड ॥ एकमेकां शब्द करिती ॥९॥
आनंदे मयूर नाचती ॥ कोकिळा सुस्वरें बोलती ॥ अनेक परीचे पक्षी जाती ॥ वृक्षशाखीं बैसले ॥१०॥
ऐसें वन शोभायुक्त ॥ द्विज चालिले पहात पहात ॥ ते चंद्रचूडा सभा अकस्मात ॥ देखते जाहले ॥११॥
इति क्षेत्रखंड ब्रह्मांडपुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥१२॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां कैलासवर्णनोनाम चतुर्थोऽध्याय गोड हा ॥४॥