रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री परशुराम माहत्म्य अध्याय १०

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीमद्रामचंद्राय नमः ॥
जय जया दुष्ट विध्वंसा चिदानंदा प्रकृती पुरुषा परात्परा त्‍हृषीकेशा परशुरामा तुज नमो ॥१॥
एकदां आश्रमापासून भ्रात्यांसहित परशुराम समित्कुश आणणें काम वनांतरीं प्रवेशले ॥२॥
कार्तवीर्य अर्जुनाचे सुत वैरानु बंध ते स्मरत आमच्या पित्याचा केला घात ह्मणोनी त्या संधींत पावले ॥३॥
रामवीर्यानें पराभूत न पावले कधीं सुखांत दशसहस्त्र पुत्र संख्यात ऐश्‍वर्योन्मत्त जाहले ॥४॥
नेणती परशुरामाचें रुप हतभागी ते पाप आश्रमीं येवोनि अति दर्प दुष्कृत केलें तयांनीं ॥५॥
होम शाळेसी देखून जमदग्नी आसीन तयासी मारती पाहून रेणुकेनें याचिलें परोपरी ॥६॥
तरी तेनाय कोन तियेसी अति झिटकारुन तयाचें शिर तोडून निघोनि जाती ॥७॥
तेव्हां रेणुका युत्ध दारुण करिती जाहली महान तये वेळीं एकवीस बाण लागोनी जर्जर पावली ॥८॥
दुःख शोकें रेणु तनया ऊर बडविती हस्तया रामा रामा पुत्र राया बोलोनि रडे उच्च स्वरें ॥९॥
हा राम हा राम कोठें गेलासी आमचा देव नाहीं भरवसी तूं धांव या संकटासी वध करी दुष्टाचा ॥१०॥
आहा दैव योगें करुन काय जाहलें वर्तमान बोले आक्रोशें करुन प्राण प्रिया कां न बोलसी ॥११॥
धांवा ऐकोनी परशुराम आले मातृवचन ऐकोन माता देखिली दुःखायमान बाण लागले देहासी ॥१२॥
तव पिता मारिला दुष्टांनीं रेणुका बोले दुःखें करुनी तरि त्वां करावें दुःख हरणी उपाय कुळदीपका ॥१३॥
क्षत्रिया धमांनीं देहासी बाण मारिले एकविशंती जाण तितुके वेळा नि क्षत्रीकरण जगतीसीं करावें ॥१४॥
ऐसी माता ती देखून दुःखें दाटले आपण हे तात हे साधो सद्गुण आह्मासी टाकिसी तूं ॥१५॥
करिती रामविलाप काय तयासी दुःश्राप सकळसिद्धी चरणा समीप जयाचेनी असती ॥१६॥
हे ईश्‍वर भक्तरमण दुर्जनासी दावी मोहन लोकांसी भासे जमदग्नी नंदन ज्ञानियांसी कल्पतरु ॥१७॥
सूत ह्मणती शौनकासीं ते भार्गव राम पितृदेहासी ठेवोनी घेतलें परशूसी क्षत्रियांत कराया ॥१८॥
पृथ्वीमाजीं दुष्ट राजन्य नाश करीन ससैन्य निश्चयें हेंचि पितृमान्य तें मीच सत्यकर्ता ॥१९॥
बोलोनी ऐसें परशुधर वेगें जैसा महासमीर कीं गजा पाठी सिंहवर तैसी क्रोधें चाल करी ॥२०॥
जेवीं त्रिपुरारी शंकर तैसें येऊनी माहीष्मती पुर वेढिलें अत्यंत परिकर शस्त्राऽस्त्रांनीं ॥२१॥
संग्राम केला दारुण ते राजपुत्र क्रोधायमान येऊनी असंख्यात सोडिती बाण अस्त्र योजना करिती ते ॥२२॥
इंद्रास्त्र अग्न्यास्त्र काळदंड रुद्रास्त्र वरुणास्त्र प्रचंड ब्रह्मास्त्र सोडितां ब्रह्मांड कंपित झालें ॥२३॥
अर्जुन पुत्र ते हजार सोडिती शर अपार परी नाश करी परशुधर हस्त लाघव दाविती ॥२४॥
परशुरामाचा एक बाण सहस्त्रावधींचा घेई प्राण आयुत पुत्र निर्दळण केले क्षणमात्रें ॥२५॥
दश बाणांनीं दशसहस्त्र याप्रकारें निःशेष पुत्र सैन्यहि मारिलें चतुरस्त्र निक्षत्री करणें ह्मणोनी ॥२६॥
ब्रह्मब्राह्मण यज्ञ पुरुषी क्षत्रिय जाले अतिद्वेषी तयां मारावयासी ऋषी आपण अवतरलों ॥२७॥
दुःखित मातेसी बाण लागतां बोले तूं करी नीक्षत्रियता तें मी करणें सत्यता आणी भूभार निवारण ॥२८॥
पितृवध जाला हेतू एकविंशती वेळां परंतु दुष्ट क्षत्र करावया घातू आतां जाणें निश्चयें ॥२९॥
एवं चिंतोनी भार्गव वीर स्वार्‍या केल्या रिपूवर संख्या एकविंशती वार केली पृथ्वी निष्कंटक ॥३०॥
क्षत्रिय मारिले अपरंपार मांसाचे जाले गिरिवर रक्ताचे नऊ सरोवर ॥ दिसती शवें जळ चरापरी ॥३१॥
तेणें स्यमंत कुरुक्षेत्र जगती मध्यें पवित्र प्रख्यात जालें सर्वत्र तेथें स्नानदानें पुण्य अपार ॥३२॥
पितृ शिरातें लावूनी जीवंत केलें जमदग्नी ॥ सर्व दुःखातें घालवूनी माता पिता तोषविले ॥३३॥
सर्व देवतामय यज्ञ आरंभ करिती ते प्राज्ञ परशुराम सर्वज्ञ सर्व देव ब्राह्मण बोलावूनी ॥३४॥
यज्ञामाजीं देव ब्राह्मण तृप्त जाहला हव्य वाहन संतुष्ट करोनी नारायण आले स्नानार्थ सरस्वतीसी ते ॥३५॥
नमो सरस्वती गंगे नमो नमो पाप भंगे नमो नमो बृहत्तरंगे दुःखरोग नाशिनी तूं ॥३६॥
ऐसें अवभृथ स्नान करुनी ब्रह्म नदीसी वंदूनी कृतकृत्य शोभती राम मुनी **** वीण सूर्य जैसा ॥३७॥
सर्व तेथें मुनिजन देती ते आशीर्वचन ऋषी जाती दक्षिणा घेऊन भूमिका मिळाल्या अखिलांसी ॥३८॥
हो त्यासी दिधली पूर्वदिशा ब्रह्मयासी दक्षिण दिशा अध्वयूसी पश्चिम दिशा उद्गात्यासी उत्तर ॥३९॥
अन्यांसी दिधल्या आवांतर दिशा आश्चर्य जालें शचीशा कश्‍यप करी तेव्हां आशा तयासी दिधली संपूर्ण पृथ्वी ॥४०॥
न्यूनातिरिक्त दोषांसी परिहार होणें अवश्येसीं नाहीं तरी प्रत्यवांय बहुवशी तदर्थ प्रायश्चित्त करीयेलें ॥४१॥
नाना प्रकारचीं दानें ब्राह्मण संतोषाकारणें परशुरामानें सुमनें परोपरी दीधलीं ॥४२॥
हिरे हिरण्यगारुत्मती पुष्पराग नीळ मोती माणीक गोमेद प्रवाल देती नवरत्‍नें असंख्यात ॥४३॥
रजत वस्त्रें धेनुका सालंकृत अमोलिका असंख्य कपिलिका दिल्या अतिसुलक्षणी ॥४४॥
नानापरींचीं पक्वान्नें तयांचीं यथेच्छ वायनें पर्वतापरी नानाधान्यें देवोनि तोषविलें द्विजांसी ॥४५॥
तेव्हां सपत्‍नीक जमदग्नी प्राप्त जाले सप्तऋषी गणीं जयाचें यश वर्णिता प्राणी मुच्यते सर्व पातका तू ॥४६॥
जामदग्न्यही भगवान कमल लोचन परशुराम सातव्या मन्वंतरीं पूज्यमान सप्तऋषीं माजीं होती ते ॥४७॥
अद्यापि आहेत न्यस्त दंड महेंद्र पर्वतीं वास अखंड ॥ भक्तांसी ज्ञान देऊनि उदंड मनोरथ पुरवीती ॥४८॥
परशुराम विश्‍व गुरु अनंत विद्येचे सागरु भक्त जनांसी कल्पतरु मोक्ष काम उदारधी ॥४९॥
परशुराम महेंद्र पर्वतीं सच्छिष्यांसी विद्या सांगती देवऋषी मनुष्य सेविती सकाम अथवा निष्काम ॥५०॥
कोणे एके काळीं परशुरामानीं भूतळीं ऐकिला राजा क्षत्रिय कुंळीं प्रख्यात त्रिलोकीं दिग्विजयी ॥५१॥
क्षत्रिय कुळ मातलें ह्मणूनी परीभूत भविष्यातें ज्ञानी ह्मणती अवशिष्ट राजधानी जनकपुरी राहिली काय ॥५२॥
आणीक असे अयोध्या जनकपुरीशी जाऊं सध्यां क्षत्रिय सेना होय वध्या ऐसें चिंतोनी निघाले ॥५३॥
हातीं घेतला परश आणीक अए शर धनुष्य संभ्रमानीं उत्तर दिशेस गमन करिती ते ॥५४॥
मार्गी देशीचे ब्राह्मण येऊ निघेती दर्शन वंद्य वंदिती चरण मनोभावें पूजिती ॥५५॥
अपार सौंदर्याची खाणी शरधनू फरशुपाणीं कुरळ केश मधुरवाणीं कर्णी कुंडलें झळकती ॥५६॥
कंठीं शोभे वैजयंती स्मित हास्य मेघकांती शरणागतासी वर देती ॥ येती जनकपुरासी ॥५७॥
देखिलें तें महानगर जैसें कीं कुबेरपुर जेथें प्रत्यक्ष वसुधावतार तेथील वर्णन काय करावें ॥५८॥
अपूर्वत्या पुराचा महिमा तेथील भयाभीत क्षत्रियसेना अवलोकिती परशुरामा आरिष्ट आलें ह्मणतीते ॥५९॥
कोणी परशुराम स्तवन कोणी करिती वंदन पूजन दर्शनें कृतकृत्य कांहीं जन साधु साधु बोलती ॥६०॥
पर्शुराम चालिले वाटे जागोजाग असती चवाटे तेथें स्वर्ण रत्‍नांचीं द्वार कपाटें राजवाडयाचीं शोभिवंत ॥६१॥
द्वारीं असती दिग्गज झुल्लती विचित्र सहज शब्द करिती आनंद काज सालंकृत ते मदभावी ॥६२॥
घोडेस्वार ते असंख्य पदाती करिती तया सख्य अलंकृत जैसी चित्रेंलेख्य वाद्य श्रवणी जाहले ॥६३॥
राजवाडयासी आले भार्गव ब्राह्मणासी नसे अटकाव त्यांत प्रत्यक्ष भूमिदेव नारायण अवतारी ॥६४॥
परावरज्ञ ते ऋषी स्वधनू ठेवोनि द्वारासी गेले राम अंतर्गृहासी सूर्य जैसा प्रळयींचा ॥६५॥
सन्मुख जावोनी जनक चरणीं ठेविलें मस्तक पूजा केली भक्तिपूर्वक प्रार्थून ह्मणे काय आज्ञा ॥६६॥
सर्व राज्याचें केलें अर्पण हे परशुरामा तव चरण दास्यत्व देऊनी आपण कुल आमुचें रक्षावें ॥६७॥
तुह्मीं नारायण साक्षांत पूर्वी विरिंची प्रार्थीत दुष्टांचा करावया घात निवारणार्थ भूभारा ॥६८॥
अवतरला संकर्षण पालन केले गोब्राह्मण भक्तांसी दिधलें दर्शन यशामृत विस्तारलें ॥६९॥
दुष्ट क्षत्रियांसी अंत का, भक्तभय निवारका देवदेवा विश्‍वेशा एका स्वयंज्योती नमोस्तुते ॥७०॥
श्लोक ॥ परशुराम नमस्तुभ्यं वीरायाद्भुत कर्मणे ॥ गुरवे जगतां ब्रह्मन् भार्गवाय नमो नमः ॥१॥
रामासीं केलें स्तवन नमन इतुक्यांत अंतर्गृहांतूनि येऊन सीताजगन्माता ती रांगून बाळपण दाविते ॥७१॥
परकीय कोणी आले ह्मणून बापाचे पाठीं बैसे लपून ॥ परशुरामासी पाहे लक्षून मनीं ह्मणे कोण हे ॥७२॥
न होय मायेसी ओळख तदधी न काय जाणती देख अनुमानें ह्मणे नर सख असेल कीं ॥७३॥
माया असे त्रिगुणज्ञ ईश होय अनंत गुणज्ञ जेथें महामाया किंचिज्ञ मग हे अस्वतंत्र काय जाणती ॥७४॥
(बरें असो पुढें) सीता रांगोनि दावी हास्यासी द्वारीं सहज गेली क्रीडेसी तों देखिलें विचित्र धनूसीं खेळणें ह्मणे हें उत्तम असे ॥७५॥
आणूनि जनकासीं दाविलें तेव्हां भार्गवानीं अश्चर्य केलें आणी गौप्यजन का ते वदले स्वहित अत्यंत ॥७६॥
हे जन का कीर्ती धन्या भूमिकाऽवतार तव कन्या हीच लक्ष्मी नोहे आन्या तुझे कुळीं प्रगटली ॥७७॥
माझें धनू अतिविशाळ काय हालविती मर्त्य सकळ नाश पावले मोठे प्रबळ टणत्कार शब्दानीं ॥७८॥
धनुष्य उचलिलें दुरुत्यज तुझिया कन्येनें सहज तरी ऐक माझें वाक्य आज स्वयंवर करावें ॥७९॥
सकळ राजे यांची परिक्षा शैव धनूसी बाण योजन शिक्षा हेचि स्वयंवरीं पण दीक्षा करावी अद्भुत ॥८०॥
जालें हें अवतार कृत्य दुसरा केला असे सत्य रावणादि दस्यु व्रात्य वधोनि साधूसी रक्षिजे ॥८१॥
ऐसें ऐकोनी मिथिल राजा नमन करी अपारतेजा विनय वचनीं बोले वोजा परशुरामाप्रती ॥८२॥
आपलें वचन ऐकोनी चिंता लागली माझे मनीं कोण वरील पण जिंकोनी माझिया कन्येसी ॥८३॥
परशुरामा स्वानंद पते जिंकील कोण शैव धनूतें कोण असे उद्भवले पृथ्वीतें आपण परिसावें ॥८४॥
तेव्हां ह्मणे फरशुधर ब्रह्मयानें प्रार्थीत लक्ष्मीवर रघुकुळीं जाला जो कौसल्या कुमर तोचि तव कन्येतें जिंकील ॥८५॥
ऐसें बोलूनी जनकाला ह्मणे आपुला अवतार पूर्ण जाला जाणोनी निघाले तपाला परशुरामस्वानंदपती ॥८६॥
जामदग्नि आश्रमाप्रती भ्रुगुकुलदीप तप करिती भाविकांसी भुक्ति मुक्ती देती सेवन केलिया ॥८७॥
पुढें कथाती अपूर्व वर्णना विषयी सर्व श्रीरामपदीं भक्तिभाव ठेवोनि ऐकिजे ॥८८॥
भगवत्कथेची गोडी अमृतापेक्षां आवडी कर्मबंध तो अत्यंत तोडी श्रवणाचेनि मात्रें ॥८९॥
स्वस्ति श्रीपरशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु दशमोध्याय गोड हा ॥१०॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥