मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. अयोध्या विशेष
Written By

राम, लक्ष्मण आणि सीतेच्या देह त्यागाची कथा

रामायणात राम राज्य स्थापित झाल्यानंतरची कथा फारच कमी लोकांना माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे की राम कथेचे समापणााची कसे झाले होते आणि यांनी आपल्या शरीराचा त्याग कसा केला. जाणून घ्या पूर्ण रोचक कथा ...
 
रामायण समपणाची कथा सुरू होते सीतेच्या अग्नी परीक्षेनंतर. जेव्हा प्रजेने सीतेबद्दल ही अफवा फैलावणे सुरू केली की रावणाकडे राहिल्यानंतर सीता अपवित्र झाली आहे. तरीही रामाने तिला महालात ठेवले आहे. 
 
रामापर्यंत जेव्हा ही बातमी पोहोचली तर त्यांना फार दुख झाले आणि त्यांनी सीतेला जंगलामध्ये सोडण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मणाने जेव्हा सीतेला जंगलामध्ये सोडले तेव्हा ती गर्भवती होती. तेथे ती ऋषी वाल्मीकीच्या आश्रमात राहत असून तिने दोन मुलांना लव व कुश यांना जन्म दिला.
रामाने जेव्हा राजसूय यज्ञाचे आयोजन केले तेव्हा लव कुशने रामायणाचे गायन केले. तेव्हा श्रीरामाला जाणीव झाली की सीता पवित्र आहे आणि त्यांनी ऋषींचा सल्ला घेऊन सीताच्या परीक्षणाचे निर्णय घेतले. सीतेने ते स्वीकार केले. 
 
सिताने या वेळेस देह सोडण्याचा निर्णय घेऊन पृथ्वीशी प्रार्थना केली. हे माते मी कधीही रामाशिवाय कोणाचा स्पर्श केला नसावा. आपले सतीत्व भंग केले नसतील तर तू मला तुझ्यात सामावून घे. तेव्हा धरती फाटते आणि सीता त्यात सामावून जाते. 
 
जेव्हा अवतारांची वेळ पूर्ण झाली तेव्हा रामाशी भेटायला काळ आला. काळ अर्थात वेळेचा देवता. काळाने रामाला म्हटले की त्यांच्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे आणि ते फक्त आमच्या दोघांमध्येच राहील म्हणून जे कोणी आमच्या गोष्टी ऐकतील तुम्ही त्यांचे वध करून द्या. 
 
राम त्याला वचन देतो की ठीक आहे मी असेच करेन. राम लक्ष्मणाला दारावर पहारा देण्यासाठी उभे करतो तेवढ्यात तेथे ऋषी दुर्वासा येतात. ते लक्ष्मणाला म्हणतात की त्यांना श्रीरामाची भेट घ्यायची आहे. लक्ष्मण दुर्वासाच्या श्रापाच्या भितीने रामाच्या खोलीत गेले आणि दुर्वासा ऋषीच्या येण्याचे वृत्त दिले. त्यानंतर रामाने आपण दिलेल्या वचना खातर लक्ष्मणाचा परित्याग केला,  कुणा आपल्याचे परित्याग करणे म्हणजे त्याला मारण्या सारखेच आहे. 
 
यानंतर लक्षमणाने दुखी होऊन सरयू नदीच्या काठावर आपले प्राणवायू थांबवले आणि सशरीर स्वर्गात गेले. या प्रसंगामुळे राम फारच दुखी झाले त्यांनी लव कुशाचे राज्याभिषेक केले आणि काही काळानंतर सरयू नदीत आपले देह त्यागले.