मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 12 एप्रिल 2021 (08:42 IST)

सोमवती अमावस्या उपाय

महादेवाला समर्पित सोमवती अमावस्या दारिद्रय दूर करण्यास मदत करते. सोमवार चंद्राचा दिवस आहे. या दिवशी सूर्य व चंद्र एकाच रेषेत असतात. हा विशेष पर्व विशेष पुण्य फल प्रदान करणारा आहे. 
 
शास्त्रांप्रमाणे सोमवार येणार्‍या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटलं जातं. यासाठी शास्त्रांमध्ये काही विशेष उपाय सांगण्यात आले आहे ज्याने जीवनातील कष्ट नाहीसे होतात.
 
1. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जानवे अपिर्त करावं. ‍प्रभू विष्णुच्या नावाचं एक जानवं आणखी पिंपळाला अर्पित करुन प्रार्थना करावी. नंतर 108 वेळा प्रदक्षिणा घालाव्या. पिंपळाला गोडाचं नैवेद्य दाखवावं. प्रदक्षिणा घालताना 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' मंत्राचा जप करावा. नंतर कळत-नकळत आपल्याकडून घडलेल्या चुकांची क्षमा मागावी. 
 
2. सोमवती अमावस्येला जवळपासच्या झाडांवर बसलेल्या कावळ्यांना व तळावातील मासोळ्यांना तांदूळ व तुपाने तयार लाडू खाऊ घालावा. याने पितृ दोष दूर होतो.
 
3. पितृ दोष शांतीसाठी अमावस्येच्या व्यतिरिक्त दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी.
 
4. सोमवती अमावस्येला पितृ दोष दूर करण्यासाठी दक्षिण दिशेला धुनी लावावी व खीर अर्पित करावी. 
 
5. सोमवती अमावस्येला एका ब्राह्मणाला भोजन व दक्षिणा किंवा वस्त्र दान केल्याने पितृ दोष दूर होतो.
 
6. सोमवती अमावस्येला निम्न मंत्र जाप करावा-
 
मंत्र- 'अयोध्या, मथुरा, माया, काशी कांचीर्अवन्तिका पुरी, द्वारावतीश्चैव सप्तैता मोक्ष दायिका।।
 
- गंगे च यमुनेश्चैव गोदावरी सरस्वती, नर्मदा, सिंधु कावेरी जलेस्मिने संन्निधि कुरू।।'
 
अमावस्येला आध्यात्मिक चिंतन व पूजन-अर्चन करणे उत्तम ठरतं.