1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

हनुमानाच्या जीवनातील 5 कथा The Most Important Stories of Hanuman

Hanuman Puja
हनुमंताच्या जीवनातील 5 महत्त्वाचा कहाण्या
 
वाल्मिकी रामायणाशिवाय जगभरातील रामायणात हनुमानजीशी संबंधित शेकडो कथांचे वर्णन आढळते. त्यांच्या बालपणापासून ते कलियुगापर्यंतच्या हजारो कथा वाचायला मिळतात. हनुमानजींना कलियुगातील संकट निवारक देवता म्हटले आहे. केवळ त्याची भक्ती फलदायी असते. चला जाणून घेऊया असे कोणते 5 प्रसंग आहे जे आजही प्रचलित आहेत.
 
1. चारों जुग परताप तुम्हारा : लंकावर विजय मिळवून अयोध्या परतल्यावर जेव्हा श्रीराम त्यांना युद्धात मदत करणारे विभीषण, सुग्रीव, अंगद इतरांना कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देतात तेव्हा हनुमानजी श्री रामाची प्रार्थना करतात.- ''यावद् रामकथा वीर चरिष्यति महीतले। तावच्छरीरे वत्स्युन्तु प्राणामम न संशय:।।''
 
अर्थात : 'हे वीर श्रीराम! जोपर्यंत या पृथ्वीतलावर रामाची कथा प्रचलित होत राहील, तोपर्यंत माझा प्राण या देहात वास करावा.' यावर श्रीराम त्यांना आशीर्वाद देतात- 'एवमेतत् कपिश्रेष्ठ भविता नात्र संशय:। चरिष्यति कथा यावदेषा लोके च मामिका तावत् ते भविता कीर्ति: शरीरे प्यवस्तथा। लोकाहि यावत्स्थास्यन्ति तावत् स्थास्यन्ति में कथा।'
 
अर्थात् : 'हे कपिश्रेष्ठ, असेच घडेल, यात शंका नसावी. जोपर्यंत माझी कथा जगात प्रचलित आहे, तोपर्यंत तुझी कीर्ती अमिट राहील आणि तुमच्या शरीरात प्राण राहतील जोपर्यंत हे लोक बनले राहतील, तोपर्यंत माझी कथा देखील स्थिर राहील.' चारों जुग परताप तुम्हारा, है परसिद्ध जगत उजियारा।।
 
2. संजीवनी पर्वत दोनदा उचलले : बालपणी एकदा हनुमानजींनी देवगुरु बृहस्पतीच्या आज्ञेवरून वडिलांसाठी समुद्रातून संजीवनी पर्वत आणला. हे पाहून त्याची आई खूप भावूक होते. यानंतर राम-रावण युद्धात रावणाचा पुत्र मेघनाद याने शक्तीबाणाचा वापर केला तेव्हा लक्ष्मणासह अनेक वानर बेहोश झाले. जामवंताच्या सांगण्यावरून हनुमानजी संजीवनी वनौषधी घेण्यासाठी द्रोणाचल पर्वताकडे निघाले. वनौषधी ओळखू न आल्याने त्यांनी डोंगराचा एक भाग उचलला आणि परत जाऊ लागले. वाटेत त्याला कालनेमी राक्षसाने अडवले आणि युद्धासाठी आव्हान दिले. कालनेमी हा रावणाचा अनुयायी होता. कालनेमी रावणाच्या सांगण्यावरूनच हनुमानजींचा मार्ग अडवण्यासाठी गेला होता. पण रामभक्त हनुमानाला त्याच्या कपटाची जाणीव झाली आणि त्याने लगेचच त्याचा वध केला.
 
3. विभीषण आणि राम यांची भेट घडवून दिली : जेव्हा हनुमानजी सीतामातेच्या शोधात विभीषणाच्या महालात जातात. विभीषणाच्या महालावर कोरलेली रामाची खूण पाहून ते प्रसन्न होतात. तिथे विभीषण यांना भेटतात. विभीषणला परिचय विचारतात स्वत: रघुनाथाचा भक्त म्हणून ओळख करून देतो. हनुमान आणि विभीषण यांचे दीर्घ संभाषण झाल्यावर हनुमानजींना माहित पडतं की हे कामाचे व्यक्ती आहे.
 
यानंतर श्रीराम लंकेवर आक्रमण करण्याच्या तयारीत असताना, विभीषणाचा रावणाशी वाद सुरू होता, शेवटी विभीषण राजवाडा सोडतात आणि रामाला भेटण्यासाठी आतुरतेने समुद्राच्या या बाजूला येतात. विभीषण येताना पाहून वानरांनी शत्रूचा एक खास दूत असल्याचे जाणून त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही.
 
सुग्रीव म्हणतात - 'हे रघुनाथजी! ऐका, रावणाच भाऊ भेटायला आला आहे' प्रभु म्हणतात - 'हे मित्र! तुम्हाला काय वाटतं ?' वानरराज सुग्रीव म्हणतात - 'हे नाथ! राक्षसांची माया कळून येत नाही. इच्छेने रूप बदलणारा हा कोणत्या कारणाने आला आहे हे माहीत नाही.' अशात हनुमानजी सर्वांचे सांत्वन करतात आणि राम सुद्धा म्हणतात की आश्रयाची भीती दूर केली पाहिजे हे माझे व्रत आहे. अशाप्रकारे श्रीराम-विभीषणाची भेट हनुमानजींमुळेच निश्चित झाली.
 
4. सर्वप्रथम रामायण लिहिले : धर्मग्रंथानुसार, विद्वानांचे म्हणणे आहे की हनुमानजींनी प्रथम रामकथा लिहिली आणि तीही आपल्या नखांनी खडकावर. ही रामकथा वाल्मिकीजींच्या रामायणाच्याही आधी लिहिली गेली होती आणि ती 'हनुमद रामायण' म्हणून प्रसिद्ध आहे. ही घटना घडली तेव्हा श्रीराम प्रभु रावणावर विजय मिळवल्यानंतर श्रीराम अयोध्येत राज्य करू लागले होते आणि श्री हनुमानजी हिमालयात जातात. तेथे ते शिव तपश्चर्येदरम्यान रोज खडकावर नखांनी रामायणाची कथा लिहीत असे. अशा प्रकारे त्यांनी भगवान श्रीरामाच्या महिमाचा उल्लेख करणारे 'हनुमद रामायण' रचले.
 
काही काळानंतर महर्षी वाल्मिकींनीही 'वाल्मिकी रामायण' लिहिले आणि ते लिहिल्यानंतर त्यांना ते भगवान शंकरांना दाखवून त्यांना अर्पण करण्याची इच्छा झाली. ते रामायण घेऊन शिवाचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वतावर पोहोचले. तेथे त्यांना हनुमानजी आणि त्यांनी लिहिलेले 'हनुमद रामायण' पाहिले. हनुमद रामायण पाहून वाल्मिकीजी निराश झाले.
 
वाल्मीकिजींना निराश बघून हनुमानजींनी त्यांना निराश होण्याचे कारण विचारले तेव्हा महर्षी म्हणाले की त्यांनी अथक परिश्रमानंतर रामायण लिहिली. पण तुमचं रामायण पाहिल्यावर आता माझ्या रामायणाकडे दुर्लक्ष होईल असं वाटतं, कारण तुम्ही जे लिहिले आहेस त्या तुलनेत माझे रामायण काहीच नाही. त्यानंतर वाल्मिकीजींची चिंता दूर करण्यासाठी श्री हनुमानजींनी हनुमद रामायण पर्वत शिला एका खांद्यावर उचलून आणि महर्षी वाल्मिकींना दुसऱ्या खांद्यावर बसवून आपली रचना श्रीराम यांना अर्पण करून समुद्रात विसर्जित केली. तेव्हापासून हनुमानाने रचलेले हनुमद रामायण उपलब्ध नाही. ती अजूनही समुद्रात पडून आहे.
 
5. हनुमान आणि अर्जुन : आनंद रामायणात वर्णित आहे की अर्जुनाच्या रथावर हनुमान विराजित होण्यामागील देखील कारण आहे. एकदा रामेश्वरम तीर्थमध्ये अर्जुनाचे हनुमानांशी मिलन होतं. या पहिल्या भेटीत अर्जुन हनुमानजींना म्हणाला- 'अरे, राम आणि रावणाच्या युद्धाच्या वेळी आपण तिथे होतास?'
 
हनुमानजी - ‘होय’, तेव्हा अर्जुन म्हणाला - ‘आपले गुरु श्री राम हे धनुष्यधारी होते, मग त्यांना समुद्र पार करण्यासाठी दगडी पूल बांधण्याची काय गरज होती? जर मी तिथे हजर असतो तर मी समुद्रावर बाणांचा पूल बनवला असता, ज्यावर चढून तुमची संपूर्ण वानर सेनेने समुद्र पार केली असती.’
 
यावर हनुमानजी म्हणतात - ‘अशक्य, बाणांचा पूल तेथे कोणतेही काम करू शकला नसता. आमचा एक ही वानर चढला असता तर तर बाणांचा पूल तुटला असता.
अर्जुन म्हणाला - ‘नाही, बघा हे समोर सरोवर आहे आणि आता मी त्यावर एक पुल निर्माण करतो. आपण या पुलावरुन सहज सरोवर पार करु शकता.’
 
हनुमान म्हणाले - ‘अशक्य’
 
तेव्हा अर्जुनने म्हटले - ‘तुमच्या चालण्याने पूल तुटला तर मी आगीत प्रवेश करीन आणि तो तुटला नाही तर तुम्हाला आगीत जावे लागेल.’
 
हनुमानाने हे स्वीकार केले की जर माझी दोन पावले सहन केली तर मी पराभव स्वीकारेन.’
 
तेव्हा अर्जुनाने आपल्या प्रचंड बाणांनी सेतू तयार केला. सेतू निर्माण होयपर्यंत हनुमान लघु रुपात होते परंतु सेतू तयार झाल्यावर त्यांनी विराट रूप धारण केले.
 
रामाचे स्मरण करून हनुमान त्या बाणांच्या पुलावर चढले. पहिले पाऊल टाकताच संपूर्ण पूल डळमळू लागला, दुसरे पाऊल टाकताच तो कोसळू लागला आणि तिसरे पाऊल टाकताच तलावाचे पाणी रक्तमय झाले.
 
तेव्हा श्री हनुमान सेतुहून खाली उतरले आणि अर्जुनाला अग्नी तयाराला सांगितले. अग्नी पेटल्यावर हनुमान आगीत उडी मारू लागले तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले आणि म्हणाले 'थांबा!' अर्जुन आणि हनुमानाने त्यांना नमस्कार केला.
 
देवाने संपूर्ण प्रसंग जाणून घेतल्यावर म्हटले की ‘हे हनुमान, आपले तिसरे पाऊल सेतुवर पडला असताना मी कासव बनून सेतूखाली निजलेला होतो. आपल्या शक्तिमुळे पाय ठेवताच माझ्या कासव रुपातून रक्त निघू लागले. मी कासव रुपात नसतो तर हा सेतू तर आपल्या पहिल्या पावलातच तुटला असता’

हे ऐकून हनुमानाला कष्ट झाला आणि त्यांनी क्षमा मागितली‘मी आपल्या पाठीवर पाऊल ठेवल्यामुळे मोठा गुन्हेगार ठरलो. माझा हा गुन्हा कसा दूर होईल देवा?'' तेव्हा कृष्ण म्हणाले, हे सर्व माझ्या इच्छेने झाले आहे. काळजी करु नकोस आणि अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर तुला स्थान मिळावे अशी माझी इच्छा आहे.