शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शनिवार, 4 मे 2024 (09:06 IST)

वरुथिनी एकादशी 2024 काय करावे- काय करु नये

vishnu
हिंदू पंचागानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी आहेत. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी म्हणतात. या वर्षी वरुथिनी एकादशीचे व्रत 4 मे 2024 रोजी पाळले जाणार आहे. शास्त्रात एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे आणि विशेष मानले गेले आहे. हे व्रत भगवान विष्णूच्या वराह अवताराला समर्पित आहे.
 
वरुथिनी एकादशीला काय करू नये 
हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्ती मिळते आणि शुभ फल प्राप्त होते. असे मानले जाते की जो कोणी वरुथिनी एकादशीचे व्रत पाळतो आणि विधीप्रमाणे पूजा करतो त्याला वैकुंठधामची प्राप्ती होते. तथापि, एकादशी व्रताचे काही महत्त्वाचे नियम आहेत ज्या प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे. याशिवाय अशी काही कामे आहेत जी आपण चुकूनही या दिवशी करू नयेत. चला जाणून घेऊया एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये...
 
वरुथिनी एकादशी 2024 ला काय करावे आणि काय करू नये?
या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान विष्णूसमोर व्रत पाळण्याचे संकल्प घ्यावे.
वरुथिनी एकादशी व्रताच्या वेळी भक्ताने झोपणे, इतरांना शिव्या देणे आणि खोटे बोलणे टाळावे.
एकादशीच्या दिवशी मांस आणि मद्य किंवा कोणत्याही प्रकारचा मादक किंवा तामसिक पदार्थांचे सेवन करू नये.
एकादशीच्या दिवशी राग करणे टाळावे. तसेच या दिवशी कोणासाठीही अपशब्द वापरू नका.
एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका. एकादशीच्या दिवशी तुळस तोडणे देखील अशुभ मानले जाते, म्हणून त्याची पाने एक दिवस आधी तोडून ठेवावीत.
एकादशी तिथीला देशी तूप वापरणे श्रेयस्कर आहे. या दिवशी केस धुणे टाळा. दशमी तिथीलाच केस धुवावेत.
एकादशी व्रताच्या दिवशी, भक्ताने श्रीमद भागवत किंवा श्रीमद भागवत गीतेचे पठण केले पाहिजे आणि भगवान विष्णूच्या मंत्रांचाही जप केला पाहिजे.
तसेच एकादशीच्या दिवशी भात खाणे निषिद्ध मानले जाते, त्यामुळे या दिवशी उपवास केला नाही तरी भात खाणे टाळावे.
 
वरुथिनी एकादशीला काय करावे?
या दिवशी भगवान विष्णूची पूजा करताना तुळशी अर्पण करा. भगवान विष्णूंना तुळशीवर खूप प्रेम आहे. तुम्ही एकादशीचे व्रत पाळले नसले तरीही या दिवशी फक्त सात्विक वस्तूंचे सेवन करावे.
द्वादशी तिथी संपण्यापूर्वी एकादशीचे व्रत सोडावे. याशिवाय एकादशीच्या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे, त्यामुळे एकादशी तिथीला दान करण्यास विसरू नका.