बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 26 ऑगस्ट 2023 (17:22 IST)

घरातील असाध्य रोग्यांना आराम मिळावा यासाठी उमादेवीचे व्रत

puja
ज्या दिवशी नवमीला मंगळवार असेल त्या दिवशीच हे व्रत करावे. सकाळी स्नान करुन आपल्या देवातील देवीची मूर्ती बाजूला काढून ती एका तबकडीत वस्त्रावर ठेवावी. तिला गंध, फूल, हळद, कुंकू व अक्षता वाहाव्यात. नंतर तिच्यापुढे दर्भाच्या तीन काड्या, नैवदे्याच्या वाटीत केशर, पाणी व कापराची एक वडी ठेवा. नंतर तिला धूपदीप ओवाळून तिची आरती करावी व सात वातींची समई लावून ठेवावी. 
 
त्या दिवशी एक धान्याचे भोजन करावे. आंबट पदार्थ खाऊ नयेत. दुसर्‍या दिवशी पूजा मोडावी. जगन्मातेची कृपा होईल. घरातील असाध्या रोग्याला आराम वाटू लागेल.
 
अस्वीकरण (Disclaimer) : औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेब जगतात प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.