शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (08:39 IST)

आज विनायक चतुर्थी पूजा मुर्हूत आणि पद्धत

मंगळवारी विनायक चतुर्थी साजरी केली जात आहे. या दिवशी भक्त उपवास करुन नियमानुसार गणपतीची पूजा करतात. पंचांगानुसार वृद्धी योगानंतर दुपारी ४:२२ पर्यंत ध्रुव योग आहे. या योगात पूजा केल्याने भक्तांना प्रत्येक कार्यात यश मिळेल.
 
हिंदू धर्मात कोणत्याही कार्याच्या यशासाठी सर्वप्रथम श्रीगणेशाची पूजा केली जाते. या दिवशी उपवास करून श्रीगणेशाची आराधना केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. भक्तांना सुख, समृद्धी आणि कीर्ती प्राप्त होते. तो सर्व संकटे दूर करतो.
 
विनायक चतुर्थी पूजा पद्धत
या दिवशी स्नान आटोपल्यानंतर व्रत करावे. यानंतर पूजा साहित्य फुले, धूप, दिवा, कापूर, रोळी, मोलीलाल, चंदन, मोदक इत्यादी गोळा करून अनुक्रमे गणेशाची पूजा करावी. त्यांना दुर्वा अर्पण कराव्या. मोदक किंवा लाडू अर्पण करा. पूजा केल्यानंतर सर्व देवतांचे स्मरण करावे. पूजेच्या शेवटी गणेशाची आरती करावी, नंतर प्रसाद वाटावा. दुसऱ्या दिवशी दानधर्म करून उपवास सोडावा.