1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. Wednesday Worship Ganesh Puja

बुद्धीचा दाता गणपती बाप्पा! बुधवारी अशी करा विशेष आराधना, मिळतील शुभ फळ!

बुधवार हा श्री गणेशाचा प्रिय वार मानला जातो. बुद्धी, विवेक आणि विघ्नहर्त्या गणपती बाप्पाची बुधवारी विशेष आराधना केल्याने सर्व कार्ये विनाअडथळा पार पडतात.

गणपती बाप्पाची बुधवारी करावयाची सोपी उपासना आणि पद्धत
दुर्वा अर्पण करा: गणपती बाप्पाला २१ दुर्वांची जुडी अर्पण करावी. दुर्वा अर्पण करताना ॐ गं गणपतये नमः या मंत्राचा जप करावा.

गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य: बाप्पाला मोदक प्रिय आहेतच, पण बुधवारी लाल गूळ आणि सुके खोबरे किंवा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवणे अत्यंत शुभ मानले जाते.

शमीची पाने: गणपतीला दुर्वांसोबत शमीची पाने अर्पण केल्याने बुद्धी तीव्र होते आणि अभ्यासात किंवा कामात यश मिळते.

सिंदूर तिलक: बाप्पाच्या चरणी लाल सिंदूर अर्पण करून स्वतःच्या कपाळावर टिळा लावावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते.

अथर्वशीर्ष पाठ: बुधवारी सकाळी किंवा संध्याकाळी श्री गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे.

जपाचा मंत्र:
ॐ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
उंचच उंच थर आणि कोट्यवधींची बक्षीसे! जाणून घ्या महाराष्ट्रातील टॉप दहीहंडी ठिकाणे