1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. what color saree to wear on Haritalika

Hartalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी? जाणून घ्या शुभ रंग आणि त्यामागचं महत्त्व आणि कारण

हरितालिका तृतीयेचे व्रत हे अत्यंत पवित्र आणि कडक नियमांचे मानले जाते. शास्त्रानुसार हे व्रत अखंड सौभाग्य आणि मनोवांछित फलप्राप्तीसाठी केले जाते. या दिवशी केलेल्या पूजेचे पूर्ण फळ मिळण्यासाठी आणि शिव-पार्वतीचा कोप टाळण्यासाठीपूजेच्या वेळी योग्य रंगाचे वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार सौभाग्याशी जोडलेले आणि ऊर्जा देणारे रंग या दिवशी वापरल्याने पूजा यशस्वी होते. पूजे साठी हे काही विशिष्ट रंग वापरल्याने हरितालिके व्रताचे चांगले फळ मिळतात.चला तर मग जाणून घेऊ या. कोणत्या रंगाचा वापर करावा.

१. हिरवा रंग (Green Color)

 
महत्त्व: हरितालिकेला हिरवा रंग परिधान करणे सर्वात उत्तम मानले जाते.
 
कारण: हिरवा रंग निसर्ग, समृद्धी, आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक आहे. श्रावण व भाद्रपद महिन्यातील सणांमध्ये हिरव्या रंगाची साडी आणि हिरवा चुडा परिधान केल्याने देवी पार्वतीची विशेष कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.
 

२. लाल रंग (Red Color)

 
महत्त्व: सनातन धर्मात लाल रंग हा सुवासिनींच्या सौभाग्याचा आणि पवित्रतेचा मुख्य रंग मानला जातो.
 
कारण: लाल रंग प्रेम, ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक आहे. पूजेच्या वेळी लाल रंगाची साडी किंवा शाल पांघरल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते.

३. पिवळा रंग (Yellow Color)

 
महत्त्व: पिवळा रंग हा ज्ञान, पवित्रता आणि मांगल्याचे प्रतीक आहे.
 
कारण: भगवान शिव आणि श्रीविष्णू या दोघांनाही पिवळा रंग प्रिय आहे. या रंगाची साडी नेसल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि मानसिक शांतता लाभते.
 

४. नारंगी किंवा केसरी रंग (Orange/Saffron)

 
महत्त्व: हा रंग अध्यात्म, त्याग आणि भक्ती भावना दर्शवतो.
 
कारण: पूजा-अर्चा करताना केसरी किंवा नारंगी रंगाचे वस्त्र परिधान केल्याने मनातील भक्तीभाव अधिक दृढ होतो.

कोणते रंग टाळावेत?

 
काळा रंग (Black): पूजेमध्ये किंवा कोणत्याही शुभ कार्यात काळा रंग अशुभ मानला जातो, त्यामुळे या दिवशी काळी साडी नेसणे पूर्णपणे टाळावे.
 
पांढरा आणि करडा रंग (White/Grey): हे रंग औदासिन्य आणि विरक्तीचे प्रतीक मानले जात असल्याने सुवासिनींनी हरितालिकेला हे रंग वापरू नयेत.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit 
पुढील लेख
Sant Sena Maharaj Aarti in Marathi संत सेना महाराज आरती