प्राचीन काळात सदाचारी व देव-ब्राह्मणांत श्रद्धा ठेवणारा धर्मदास नावाचा एक वैश्य होता. त्याचे कुटुंब फार मोठे होते. त्यांचे पालन पोषण करणे त्याला जिकीरीचे जात होते. त्याने एकदा एका व्रताचे माहात्म्य एकले. नंतर जेव्हा हा सण आला त्याने गंगेत स्नान करून विधीपूर्वक देवदेवतांची पूजा अर्चना केली. लाडू, पंखा, पाण्याने भरलेले हंडे, जवस, गहू, मीठ, सातू, दही, तांदूळ, गुड, सोने आणि वस्त्र इत्यादी वस्तू ब्राह्मणांना दान दिल्या. त्याच्या पत्नीने त्याला असे न करण्यास वारंवार सांगितले. पुढे म्हातारपणी अनेक रोगांनी तो ग्रस्त झाला तरीही धर्म-कर्म आणि दान करतच राहिला.
याच वैश्याने पुढील जन्मी कुशावती राजा म्हणून जन्म घेतला. अक्षय तृतीयेच्या व्रत पालनामुळेच त्याला है वैभव मिळाले. वैभवसंपन्न झाल्यावरही त्याने या व्रताचे पालन केले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा