पूर्वज तसेच कुलस्वामिनी यांचे आपल्याकडे होणार्या प्रत्येक शुभ कार्यात पुजन केले जात असते. सगळ्यात आधी वरील मंडळींना निमंत्रण दिले जात असते. हिंदू धर्मानुसार शुभ कार्याआधी पितृ श्राद्ध, पितृ तर्पण केले पाहिजे. आपल्या कुटुंबात लग्न अथवा शुभ कार्य निश्चित झाले असेल तर त्याच्या पंधरा दिवस आधी आपल्या पूर्वजांच्या नावाने पिंडदान करून त्यांना तृप्त केले पाहिजे. पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याने शुभ कार्यात कोण्त्याच प्रकारच्या अडचणी येत नाही.