सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By

होळी पूजन, 8 दिवे लावा, सुख-समृद्धीला घराचा रस्ता दाखवा

होळी सणा पूजा विधीचे विशेष लक्ष ठेवले पाहिजे. याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. पूजेसाठी हळदीची गाठ, कंडे, फळ आणि भाज्यांची माळ तयार करून अर्पण केली पाहिजे. होलिका दहनापूर्वी व्यवस्थित पूजन करावे.
 
होलिकाच्या चारीबाजूला आठ दिवे लावावे. पूजेची सर्व सामुग्री होलिकावर अर्पित करावी. हे आठ दिवे होलाष्टक समाप्तीचे प्रतीक आहे आणि हे दिवे लावल्याने अशुभता नाहीशी होते.
 
या व्यतिरिक्त होळीच्या दिवशी हनुमानाला 5 लाल फुलं अर्पित करावे. असे केल्याने साधकाला पवन पुत्र हनुमानाचा आशीर्वाद प्राप्त होतो.
 
तसेच या दिवशी महादेवांकडून वरदान प्राप्तीसाठी बेलपत्रावर पांढर्‍या चंदनाचे थेंब लावून आपली मनोकामना प्रार्थना रूपात महादेवासमोर मांडावी.