होळीच्या दिवशी कोणत्या देवाला कोणता रंग लावावा
यावर्षी होळीचा सण १४ मार्च रोजी साजरा केला जाईल. होळीच्या दिवशी, सर्वप्रथम घरात स्थापित देवतांना गुलाल अर्पण केला जातो आणि त्यानंतर होळी खेळण्यास सुरुवात होते. त्याच वेळी, जर घरात विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा लड्डू गोपाळ असतील तर सर्वप्रथम त्यांची सेवा आणि पूजा केल्यानंतर, त्यांना गुलाल लावला जातो. असे मानले जाते की जर देवाला गुलाल लावून होळीची सुरुवात केली तर आयुष्यभर आनंदाच्या रंगांची कधीही कमतरता भासत नाही आणि अध्यात्म आणि भक्तीचे रंग देखील माणसाला देवाच्या जवळ आणतात. अशात होळीच्या दिवशी विठ्ठलाला प्रसन्न करण्यासाठी त्यांना कोणत्या रंगाचा गुलाल लावावा किंवा अर्पण करावा आणि त्याचे काय फायदे आहेत हे जाणून घ्या-
होळीला विठ्ठल किंवा गोपाळाला पिवळा गुलाल लावा. पिवळा रंग हा आनंद, समृद्धी आणि कल्याणाचे प्रतीक मानला जातो. अशात होळीच्या दिवशी देवाला पिवळ्या रंगाचा गुलाल लावल्याने घरात आणि जीवनात आनंद येतो आणि त्यांचा आशीर्वाद देखील कायम राहतो कारण पिवळा रंग देवांचा आवडता रंग मानला जातो.
होळीला देवी लक्ष्मीला लाल रंग अर्पण करावा. आपण देवीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करु शकता.
या दिवशी मारुतीला शेंदुरी रंग अर्पण करावा. तसेच गणपती बाप्पाला देखील हा रंग अर्पित करावा. गणपतीला लाल रंगाचे फुल देखील अर्पित करावे.
या शिवाय आपण श्रीकृष्णाला गुलाबी रंग अर्पित करु शकता. गुलाबी रंग प्रेम, स्नेह आणि सुसंवादाचे प्रतीक आहे जो भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमाची भावना प्रतिबिंबित करतो. गुलाबी गुलाल लावल्याने घरात प्रेम आणि सद्भावना वाढते, नातेसंबंध गोड होतात आणि वैवाहिक जीवन विशेषतः प्रेमळ राहते आणि त्रास दूर होतात.
तसेच या दिवशी शंकराला रंग अर्पित करायचा असेल तर निळा रंग निवडावा. होळीला तसेच राधा राणीला देखील निळा रंग अर्पित करु शकता. निळा रंग आनंदाचे प्रतीक देखील आहे. अशात होळीच्या दिवशी देवाला हे रंग अर्पित केल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांवर अनंत आशीर्वादांचा वर्षाव करतात.