सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By

होलाष्टक कथा, काय करावे या दरम्यान जाणून घ्या

होलाष्टक म्हणजे-
होळीच्या आठ दिवसांपूर्वी होलिका पूजन करत असणार्‍या ठिकाणी गंगाजल टाकून ती जागा शुद्ध करतात. नंतर तेथे वाळलेले लाकूड, कंडे, आणि होलिका दहन करण्यासाठी दोन काठ्या स्थापित केल्या जातात. एक काठी प्रह्लाद आणि दुसरी काठी त्याची आत्या होलिकेसाठी मानली जाते. याच दिवशी होलाष्टक प्रारंभ असल्याचे मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार या दिवसांमध्ये कुठलेही शुभ कार्य करू नये. विवाह, गृहप्रवेश, मूडनं, नामकरण व विद्यारंभ इत्यादी सर्व मांगलिक कार्य किंवा कुठलेही नवीन कार्य या दरम्यान प्रारंभ करणे शास्त्रानुसार वर्जित मानले गेले आहे.
 
काय करावे -
ज्योतिष मान्यतेनुसार अष्टमी ते पौर्णिमा पर्यंत नवग्रह देखील उग्र रूप घेतलेले असतात. याच कारणामुळे या दरम्यान केलेल्या शुभ कार्योंमध्ये अमंगल होण्याची आशंका असते. या दिवसांमध्ये व्यक्तीच्या निर्णय घेण्याची क्षमता कमजोर होते. होलाष्टकला व्रत, पूजन आणि हवन या दृष्टीने चांगलं मानले गेले आहे. या दिवसात केलेल्या दानामुळे जीवनातील कष्टांपासून मुक्ती मिळते.
 
कथा- 
शिव पुराणानुसार देवतांच्या विनंतीवर कामदेव यांनी महादेवाची तपस्या भंग केली होती. याने महादेव अत्यंत क्रोधित झाले होते, त्यांनी आपल्या तिसर्‍या नेत्राच्या ज्योतने कामदेवांना भस्म केले होते. प्रेम देवता कामदेव हे भस्म झाल्यावर संपूर्ण सृष्टी शोक व्याप्त झाला. आपल्या पतीला पुनः जिवंत करण्यासाठी रतीने इतर देवी-देवतांसह महादेवाला प्रार्थना केली. प्रसन्न होऊन शंकराने कामदेवांना पुर्नजीवनाचा आशीर्वाद दिला. फाल्गुन शुक्ल अष्टमीला कामदेव भस्म झाले आणि आठ दिवसानंतर महादेवाकडून रतीला त्यांच्या पुर्नजीवनाचा आशीर्वाद प्राप्त झाला. ही देखील मान्यता आहे की भक्त प्रह्लादच्या अनन्य नारायण भक्तीने क्रुद्ध होऊन हिरण्यकश्यपने होळीच्या आठ दिवसांपूर्वीपासून प्रह्लादाला अनेक प्रकाराचे जघन्य कष्ट दिले होते. तेव्हापासून भक्तीवर प्रहार केल्यामुळे हे आठ दिवस हिंदू धर्मात अशुभ मानले गेले आहे.