बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By

Holi 2024 : भिंतींना रंगांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी करा हे उपाय

रंग खेळण्यापूर्वी भिंतींवर प्लास्टिक लावावे. रंग खेळल्यानंतर झाड़ू किंवा डस्टरच्या मदतीने भिंती स्वच्छ कराव्यात. भारतातील प्रत्येकासाठी होळी, रंगपंचमी महत्वपूर्ण आणि आवडता सण आहे. हा सण आनंद, उत्साह आणि रंग यांचा पर्व आहे. ज्याला सर्व लोक उत्साहाने साजरा करतात. या दिवशी रस्ते, गल्ली, घरामध्ये रंगांची उधळण होते. पण या आनंद देणाऱ्या सणामध्ये अनेक वेळेस भिंतींचे नुकसान होते. 
 
रंग खेळतांना पुष्कळ वेळेस रंग भिंतींना लागतो आणि मग याला स्वच्छ करणे कठिन होते. पण चिंता करू नका. आम्ही तुम्हाला सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही भिंतींना रंगांपासून सुरक्षित ठेऊ शकतात. या दिवशी पार्टीचे आयोजन करणे आनंददायी असते.  
 
रंग भिंतींवर लागू नये म्हणून वार्निश स्प्रे किंवा वॉटर रेसिस्टेंस कोटिंगचा उपयोग करावा. यामुळे रंग लगेच निघतील. भिंतीवर लागलेली कोणतीही पेंटिंग, पोर्ट्रेट किंवा फोटो फ्रेमला काढून टाका. तुमच्या जवळ जर वॉलपेपर असेल, तर  तुम्ही त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी प्लास्टिक शीट लावू शकतात. 
  
कोरडे रंग भिंतींवरून काढण्याकरिता झाड़ू किंवा डस्टरचा उपयोग करा. हल्के डिटर्जेंटसोबत पाणी मिसळा आणि डागांना स्पंजने हळू हळू रगडा. तुम्ही बेकिंग सोडा, पाणी किंवा विन्हेग़रचा घोळ बनवून भिंती स्वच्छ करू शकतात.  
 
जर तुम्ही रंग खेळल्यानंतर फर्शीवरिल रंगाचे डाग कसे काढावे म्हणून चिंतित असाल तर गर्म पाणी, नमक आणि बेकिंग सोडा यांचा घोळ तयार करा हे काही वेळ फर्शीवर लावून ठेवा मग फर्शी स्वच्छ करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik