रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

अँजोलिनाची पाच लाख पौंडाची वेडिंग रिंग!

WD
हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट व अभिनेत्री अँजोलिना जोली यांच्या विवाहाच्या नौबती झडू लागल्या आहेत, त्यातच या जोडीने एकमेकांना देण्यासाठी पाच लाख पौंडाच्या अंगठ्या तसेच ‍वेडिंग बँड देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी मागणीही नोंदवण्यात आली आहे. हे जोडपे सध्या दत्तक घेतलेल्या सहा मुलांना वाढवत आहे.

या आठवड्याच्या अखेरीस त्यांचे शुभमंगल होणार आहे, असे सन ऑनलाईनने म्हटले आहे. फ्रान्सच्या ड्यू कॅप फेरात या पंचता‍रांकित हॉटेलात मॅचिंग अंगठ्या तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यासाठी अ‍ॅस्प्रे अँड गॅरार्ड ज्वेलर्सचे माजीप्रमुख हे अंगठ्या व इतर दागदागिने खास त्यांच्या शैलीने घडवित आहे.