रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

एमा वॉटसन इंटरनेटवरील धोकादायक 'सेलीब्रिटी'!

PR
हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐमा वॉटसन, इंटरनेट विश्वात 'मोस्ट डेंजरस सेलीब्रिटी' ठरली आहे. तिचे नाव 'सर्च' करणेही आता धोकादायक बनले आहे. कारण 'सर्च' करणार्‍याच्या संगणकात 'मॅलिशियस सॉफ्टवेअर' डाऊनलोड होतात. त्यामुळे संगणकात व्हायरस शिरून तो बाद करणार्‍यांच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. 'मॅकेफी'या अँटिव्हायरस बनविणार्‍या कंपनीने यासंबंधीचा अहवाला प्रसिद्ध केला आहे.

'हॅरी पॉटर' चित्रपटातील हरमायनी बनलेल्या एमा वॉटसनला लहान वयातच प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यामुळे जगभरात तिच्या 'ऑनलाईन फॅन्स'ची संख्याही लाढली, मात्र तिच्या चाहत्यांना सध्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सायबर गुन्हेगारांनी एमाच्या लोकप्रियतेचा फायदा उठविणे सुरू केले आहे. बहुतेक 'वेबसाईट'वर तिचे नाव 'सर्च' केले असता, संगणकामध्ये अनपेक्षितपणे 'मॅलिशियस सॉफ्टवेअर' डाऊनलोड होत आहेत. या सॉफ्टवेअरमुळे संगणक बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. वेब सेक्युरिटी कंपनी मॅकेफी ने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

या व्हायरसमुळे 'नेटिझन्स'ची वैयक्तिक माहिती चोरण्याच प्रकारही घडत आहेत. एमाचे नाव आठ वेळा सर्व केल्यानंतर, त्यापैकी किमान एकदा तरी असा प्रकार होत असल्याचे डेली एक्सप्रेस या दैनिकाने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. गेल्या वर्षी मॉडेल आणि अभिनेत्री हायडी क्लमच्या सर्चनंतर असे प्रकार होत होते. त्यावेळी ती इंटरनेटवरील 'डेंजरस सेलीब्रेटी' ठरली होती. यावर्षी एमाचे नाव आले आहे. याशिवाय जेसिका बेल, इव्हा मेंडेस, सेलेना गोमेझ आणि हॅली बेरी यांची नावेही 'डेंजरस सेलीब्रेटी'म्हणून ठरले होते.