शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: शनिवार, 17 जानेवारी 2015 (12:52 IST)

ऑस्कर अँवॉर्डची रेस सुरू

87 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकनाची घोषणा करण्यात आली. यामध्ये नऊ नामांकनासह गुन्हेगारी विश्वावर असलेला चित्रपट ‘द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल’ आणि डार्क कॉमेडी चित्रपट ‘बर्डमॅन’ हे ऑस्करच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. दुसर्‍या विश्वयुद्धावर आधारित असलेली ब्रिटिश फिल्म ‘द इमिटेशन गेम’ या सिनेमाला आठ तर एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट ‘अमेरिकन स्निपर’ आणि ‘बॉयहूड’ या चित्रपटांना प्रत्येकी सहा नामांकन मिळालेली आहेत. द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल, बर्डमॅन, द इमिटेशन गेम, अमेरिकन स्निपर, बॉयहूड, सेलमा, द थिअरी ऑफ एव्हरीथिंग आणि व्हिपलेश या सर्वोत्कृष्ट चित्रपटांना नामांकन देण्यात आले आहे. ‘बर्डमॅन’चे दिग्दर्शक अँलेजांद्रो गोन्सालिस इनारितू, ‘बॉयहूड’चे रिचर्ड लिंकलेटर, ‘फॉक्सकॅचर’चे बेनेट मिलर, ‘द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल’चे अँडरसन आणि ‘द इमिटेशन गेम’चे मॉर्टिन टिल्डम यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या यादीत नामांकन मिळालं आहे. ‘बर्डमॅन’चे अभिनेता मायकल किटॉन सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचं नामांकन मिळालं आहे. त्याच्यासोबतच अँलेने टय़ुरिंग, ब्रॅडली कूपर, अँडी रेडमॅने हीदेखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या रेसमध्ये आहेत. हॉलिवूडमध्ये डॉल्बी थिएटरमध्ये 22 फेब्रुवारी रोजी अँकॅडमी अँवार्डस्चं वितरण होणार आहे. या सोहळ्याचं सूत्रसंचालन नील पॅट्रिक हॅरिस करणार आहे.